तुमसर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:28+5:30

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग गतीमान होत आहे. परंतु विज्ञानाने माणूस घडवावा, वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. न्यूटन, अ‍ॅडीसन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम आझाद आदी शास्त्रज्ञांनी जिद्द व परिश्रमाच्या बळावर यश संपादीत केले. मानवी जीवन सुखी करण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडले.

District level science exhibition concludes in Tumsar | तुमसर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

तुमसर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यस्तरासाठी नऊ प्रतिकृतींची निवड । बाल वैज्ञानिकांच्या संशोधनाने सर्वांचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्हास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप येथील जनता विद्यालयात मोठ्या थाटात पार पडला. या प्रदर्शनातून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी नऊ प्रतीकृतीची निवड करण्यात आली. या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणांचे दर्शन तुमसरकरांना घडले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार नागो गाणार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकर, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र शेंडे, सेवानिवृत्त पशुआरोग्य सहाय्यक उपसंचालक डॉ.कृपाचार्य बोरकर, विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक चंद्रप्रकाश मुकद्दम, महेश सावंत, आर.टी. गायधने, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक ओ.बी. गायधने, उपमुख्याध्यापक एस.एन. लंजे, पर्यवेक्षक शरद भेलकर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ६३ प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी नऊ प्रतिकृतींची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक वरठी येथील जिल्हा परिषद हायस्कुलचा विद्यार्थी सूरज अरविंद फुलबांधे, द्वितीय क्रमांक भंडाराच्या नूतन कन्या शाळेची विद्यार्थिनी अंजली भालचंद्र सेलोकर आणि तृतीय क्रमांक मासळच्या सुबोध विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय दिगांबर सतदेवे यांना देण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक भंडाराच्या लाल बहादूर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विपूल हेडाऊ, द्वितीय जनता कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मृणाली रिनायते, तृतीय क्रमांक एकोडी येथील जिल्हा परिषद विद्यालयाची विद्यार्थिनी निशा वासुदेव सोनटक्के यांनी तर प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक पिंपळगाव मोहळी येथील शिक्षक खुशाल किसन डोंगरवार, द्वितीय क्रमांक लाखनी येथील वाघाये सैनिक शाळेचे शिक्षक संदीप उत्तमराव जाधव तर प्रयोगशाळा गटात पहेला येथील गांधी विद्यालयाचे ज्ञानदेव पी.मेश्राम यांनी पटकाविला.
विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संचालन प्रदीप वासनिक, प्रदीप गणवीर यांनी प्रास्ताविक प्राचार्य हेमंत केळवदे यांनी तर आभार गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी मानले. यावेळी प्रा.पंकज बोरकर व प्राचार्य हेमंत केळवदे यांचा सत्कार आमदार नागो गाणार व शिक्षणाधिकारी रवींद्र काटोरकर यांनी केला.
यशस्वितेसाठी प्रमोद संग्रामे, भारती बोंद्रे, राखी बिसेन, किरण शिंदे, संगीता खोब्रागडे, लिना मते, राजू गभणे, मनीष साठवणे, सोमा कापगते, दीपक हरणे, एन.जे. जाधव, एस.एस.जाधव, सी.एम. टिचकुले, एम.एस.

विज्ञानातून माणूस घडवा
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग गतीमान होत आहे. परंतु विज्ञानाने माणूस घडवावा, वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. न्यूटन, अ‍ॅडीसन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम आझाद आदी शास्त्रज्ञांनी जिद्द व परिश्रमाच्या बळावर यश संपादीत केले. मानवी जीवन सुखी करण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडले. त्याच पावलावर पाऊल ठेवून बाल संशोधकांनी सुखमय जीवनासाठी शोधासोबत माणूस घडविण्याची धडपड करावी असे आवाहन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले.

 

Web Title: District level science exhibition concludes in Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.