एसटी बसेसचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:43+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, तिरोडा आणि गोंदिया असे सात आगार आहेत. या आगारात एसटी बस निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बस जंतूनाशकाची फवारणी करून बाहेर येत आहे. यासाठी महामंडळाने प्रत्येक आगाराला पाच ते सहा अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले आहे.

Disinfection of ST buses | एसटी बसेसचे निर्जंतुकीकरण

एसटी बसेसचे निर्जंतुकीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध उपाययोजना : मास्क व सॅनिटायझर होणार उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले असून आगारातून निघणारी प्रत्येक बस निर्जंतूक करण्यात येत आहे. भंडारा विभागातील सातही आगारात ही सुविधा करण्यात आली आहे. दरम्यान बस चालक आणि वाहकांसाठी मास्क व सॅनिटायझरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, तिरोडा आणि गोंदिया असे सात आगार आहेत. या आगारात एसटी बस निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बस जंतूनाशकाची फवारणी करून बाहेर येत आहे. यासाठी महामंडळाने प्रत्येक आगाराला पाच ते सहा अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले आहे. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासंदर्भातही उपाययोजना केल्या जात असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगारस्तरावर तीन बैठका घेण्यात आल्या आहेत.
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबतच चालक - वाहकांच्या सुरेक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. चालक आणि वाहकांना मास्क उपलब्ध करून देण्यात आले असून बसमध्ये प्रवाशांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राज्य परिवहन विभागाच्या भंडारा आगाराने दोन हजार बॉटल सॅनिटायझर आणि तेवढ्याच मास्कची मागणी प्रशासनाकडे केली आहे. असे राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाचे यंत्र अभियंता गजानन नागुलवार यांनी सांगितले.

बसस्थानकावरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न
कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यातील बसस्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विभागीय स्तरावर खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांनी अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करावा असे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Disinfection of ST buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.