उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:48+5:30

प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या भागातील परिस्थितीचा विचार केला तर ग्राम दंडारी येथे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध लावणे शक्य होवू शकते. पण त्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रबळ इच्छा शक्तीची गरज आहे.

Control of malaria if substation is started | उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियावर नियंत्रण

उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियावर नियंत्रण

Next
ठळक मुद्देतपासणी मोहीम राबवा : आरोग्य विषयक जनजागृतीवर भर देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे आढळतात. ही समस्या दरवर्षीच निर्माण होते. मात्र याला प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या भागातील परिस्थितीचा विचार केला तर ग्राम दंडारी येथे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध लावणे शक्य होवू शकते. पण त्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रबळ इच्छा शक्तीची गरज आहे.
तालुक्यात एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ उपकेंद्रांचा समावेश आहे. २२ उपकेंद्र मिळून आतापर्यंत ६१ मलेरिया रूग्ण तालुक्यात आढळले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी निम्मे रूग्ण केवळ दरेकसा उपकेंद्रातील आहे. इतर २१ उपकेंद्रात अर्ध्या रुग्णांचा समावेश आहे. जुलै महिन्यात दरेकसा उपकेंद्रात सर्वाधिक मलेरिया रूग्ण सापडले आहेत ही चिंतेची बाब आहे. मलेरिया रुग्ण मोठ्या प्रमाणावर मुरकुटडोह दंडारी गावाकडून येत असतात आणि येता-येता इतर अनेक लोकांना मलेरियाचा संसर्ग करीत असतात. दरेकसा आरोग्य उपकेंद्रातून मुरकुटडोह दंडारीच्या ५ गावांना वेगळे करुन दंडारी येथे मंजूर असलेले नवीन आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास दंडारी, टेकाटोला, मुरकुटडोह १, २, ३ अशा एकूण ५ गावांना याचा लाभ मिळेल. उपकेंद्रात २ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवक लाभेल तसेच नुकतेच शासनाने प्रत्येक उपकेंद्रात एका डॉक्टरची सोय करुन देण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी सुद्धा डॉक्टरची स्थायी सोय झाल्यास लोकांना वेळीच औषध उपचार मिळण्यास मदत होईल. दरेकसा येथे जाण्यासाठी खडतर मार्गावर पायपीट करावी लागणार नाही. गावातच रक्त नमूने घेतल्यास मलेरियाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल. यावर विचार करण्याची गरज आहे.

स्वच्छताविषयक जनजागृतीची गरज
एनाक्युलीस मादी डासांच्या चावल्याने एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीला मलेरियाचा संसर्ग होतो. अशा डासांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी स्वच्छता व डासनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे. प्रकृती बिघडली की इथले लोक औषधोपचारपेक्षा झाडफूक करणाºयावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्यास त्यांना यासर्व गोष्टींपासून दूर ठेवण्यास मदत होईल.

रक्त तपासणी मोहीम राबवावी
जवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या ५ गावांमध्ये आशा, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका इत्यादी घटकांच्या माध्यमातून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीचे रक्त नमूने घेवून मलेरियाची तपासणी व औषधोपचार केल्यास मलेरियाचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल. तसेच इतर गावातून येणारे किंवा सीमे पलिकडील मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गावातून येणाºया लोकांवर नजर ठेवून त्यांना आरोग्य तपासणीसाठी बाध्य करण्याचे काम सुद्धा जबाबदारीने करावे लागेल. सुविधायुक्त आरोग्य उपकेंद्र स्थापन झाल्यास या परिसरातील गर्भवती महिलांना त्वरीत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच प्रसूती दरम्यान होणारा धोका टाळण्यास मदत होईल. हा परिसर जंगल व्याप्त दुर्गम भागात असून सर्प दंश झाल्यास वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने प्राण गमवण्याची वेळ आल्याचे प्रकार सुद्धा येथे घडले आहे.

Web Title: Control of malaria if substation is started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.