Celebrate the plastic-free Diwali with the public | लोकसहभागातून प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करा
लोकसहभागातून प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करा

ठळक मुद्देनरेश गीते : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्स

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी लोकसहभागातून लोकचळवळीच्या रूपाने राबविण्यात येत असलेल्या 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाद्वारे जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सामुहिक प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, गवळी यांची उपस्थिती होती. स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून दोन टप्यात ग्रामीण व शहरी विभागात केली जात आहे. या अभियानाला मागील दोन वर्षात लोकसहभागातून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत ग्रामीण विभागात तसेच नगर पंचायतपासून तर नगर परिषदेपर्यंत शहरी विभागात या स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करून शाश्वत स्वच्छतेकरिता विविध उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी मात्र जिल्ह्यातील गावे प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प या अभियानाद्वारे करण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी विभागात हे अभियान राबविण्यात यावे, तसेच दोन्ही टप्यात जिल्हयातील सगळया यंत्रणांनी सामुहिक प्रयत्नातून या अभियानाद्वारे जिल्ह्यातील गावे व शहरे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. पहिल्या टप्या ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात व शहरीविभागात विविध संवाद उपक्रम राबवून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. समुदाय संघटन करण्यात यावे. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्हाभर ग्राम पंचायत, शाळा, विद्यालय, महाविद्यालयस्तरावर विविध घटकांच्या सहभागातून प्लॉस्टीक गोळा करण्यासाठी शपथ व महाश्रमदान करण्यात यावे. गाव व शासकिय कार्यालये प्प्लास्टिकमुक्त करण्यात यावे असे निर्देश दिले.
त्यानंतर दुसरा टप्पा ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत राबवून जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी विभागात गोळा करण्यात आलेला प्लॉस्टीक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात यावे. हा कचरा डपींग ग्राउंडमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकत्रीत झालेल्या प्लास्टिक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा पुर्नवापर, सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये वापर, औष्णीक विद्युत केंद्र किंवा रस्ते बांधणीसाठी उपयोगात आणण्यात यावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या.
जिल्ह्यातील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी ग्राम पंचायत, नगरपंचायत, नगर परिषद यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शासकिय व निमशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे संघटन, स्थानिक लोकप्रतिनिधी, खेळाडू यांनी सहभागी होवून गावे व शहरे प्लास्टिकमुक्त करून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.


Web Title: Celebrate the plastic-free Diwali with the public
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.