कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:22+5:30

डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे काम असल्याने पावसाळ्यात कालवा फुटण्याची शक्यता असते.

Canal lining works slowly | कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने

कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने

Next
ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्पाचा डावा कालवा : बारमाही सिंचनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा-कोसरा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अजून किती वर्षे चालणार? असा प्रश्न कोंढा परिसरातील शेतकरी विचारत आहेत. गत पाच वर्षांपासून डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना बाराही महिने सिंचनाची सोय होऊ शकली नाही.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला सिंचनाची सुविधा करण्यासाठी गोसे येथे वैनगंगा नदीवर महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ३५ वर्षे झाले पण या प्रकल्पातून बाराही महिने कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळत नाही. प्रकल्पाचे दोन मुख्य कालवे आहेत. त्यामध्ये उजवा कालवा यामधून सिंचन सुविधा सुरु झाला आहे. पण कोंढ्याजवळून जात असलेल्या डावा कालवा याचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्याच्या कामात निविदामध्ये मोठा गैरव्यवहार झाला, काम निकृष्ठ दर्जाचे झाले म्हणून उच्च न्यायालय नागपूर यांनी कालव्याचे कामे पुन्हा करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सन २०१४ पासून डाव्या कालव्याचे अस्तरीकरण काढून पुन्हा नव्याने अस्तरीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते.
डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे काम असल्याने पावसाळ्यात कालवा फुटण्याची शक्यता असते. सोमनाळा गेट क्र. १ जवळ डावा कालव्याचे काम अपूरे असल्याने कालव्यात जेव्हा शेतकºयांसाठी पावसाळ्यात पाणी सोडले जाते, तेव्हा कालव्याची पाळ फुटण्याची शक्यता असते, असे प्रकार ठिकठिकाणी होत आहे, तेव्हा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम करण्याची गरज आहे.
कोंढा व परिसरातील शेतकºयांना बाराही महिने सिंचनासाठी पाणी मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

नवीन कालवे काढण्याची गरज
गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट क्र. १ जवळ भावड, सेंद्री गावातील शेतकºयांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून लहान कालवे काढले आहे. परंतु कोंढा येथील शेतकऱ्यांची शेती कोंढा स्मशानभुमी ते डाव्या कालव्यापर्यंत शेकडो एकर शेती आहे. त्या शेतीला सिंचन सुविधा देण्याचा विचार झाला नाही. तेव्हा डावा कालवा मुख्य अभियंता यांनी कोंढा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे करुन स्मशान भूमी कोंढा ते सोमनाळा गेट क्र. १ पासुन एक उपकालवा देऊन सिंचन सुविधा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशाप्रकारे डाव्या कालव्याचे रखडलेले काम पूर्ण करावे तसेच कोंढा येथील शेतकऱ्यांसाठी उपकालवा मंजूर करण्याची मागणी कोंढा गावकऱ्यांनी केली आहे. हा प्रश्न न सुटल्यास भविष्यात गावकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

Web Title: Canal lining works slowly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.