मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:17 AM2019-09-19T01:17:45+5:302019-09-19T01:19:16+5:30

दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे.

Awareness across the district to increase voting percentage | मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर जनजागृती

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर जनजागृती

Next
ठळक मुद्देपथनाट्याचा आधार : ईव्हीएम - व्हीव्हीपॅटचे तीनही मतदार संघात प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटद्वारे मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले जात असून पथनाट्यातून मतदानाचा संदेश दिला जात आहे. दिव्यांग, नवयुवक, नवयुवती व महिला मतदारांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरु आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शाळा महाविद्यालयात पथनाट्य, निबंध, रांगोळी स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा, साकोली, तुमसर या तीन विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायती उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.नरेश गीते यांनी या सर्वांना पत्र पाठवून आपल्या स्तरावर मतदार जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मिडीयावरून संदेश प्रसारित केले जात आहेत.

दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे. सीव्हीजील या आयोगाच्या अप्लीकेशनमध्ये तक्रार कशी करावी याची माहिती दिली जात आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.नरेश गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

मतदार नोंदणी मोहीम
१ जानेवारी २०१९ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणाºया तरुण तरुणींच्या नावांची नोंदणी या जनजागृती मोहिमेंतर्गत केली जात आहे. तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी व नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Web Title: Awareness across the district to increase voting percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.