रेती तस्करी करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:35+5:30

मंगळवारच्या रात्री रेतीघाटावर महसूल पथकाने धाड टाकली. त्यावेळी सदर तीन ट्रक रिकाम असल्याचे सांगण्यात आले. परंतु महसूल विभागाने कारवाईचा देखावा दाखवून जेसीबीव्दारे ट्रक रेतीने भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या ग्रामस्थांनी जेसीबी चालकाला वेठिस धरुन विचारणा केली असता जेसीबी मशीन तहसीलदार यांनी आणायला सांगितले तर ती कशासाठी, यावर चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर ट्रकमध्ये जेसीबीने रेती भरल्याचे सांगितले.

Action on three vehicles smuggling sand | रेती तस्करी करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

रेती तस्करी करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे११ लाखांचा मुद्देमाल जप्त : रेतीमाफियांना पवनी तालुका महसूल विभागाचे अभय

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : पवनी तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रेती माफियांना अभय मिळत आहे.
तालुक्यातील येनोडा नदी पात्रातून सर्रास अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी व पवनीचे तहसीलदार पोलीस पथकासह रेतीघाटावर धाड टाकली. या धाडीत तीन ट्रक ताब्यात घेऊन ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळवारच्या रात्री रेतीघाटावर महसूल पथकाने धाड टाकली. त्यावेळी सदर तीन ट्रक रिकाम असल्याचे सांगण्यात आले. परंतु महसूल विभागाने कारवाईचा देखावा दाखवून जेसीबीव्दारे ट्रक रेतीने भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या ग्रामस्थांनी जेसीबी चालकाला वेठिस धरुन विचारणा केली असता जेसीबी मशीन तहसीलदार यांनी आणायला सांगितले तर ती कशासाठी, यावर चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर ट्रकमध्ये जेसीबीने रेती भरल्याचे सांगितले. मात्र तहसीलदार यांनी मी त्यांना तसे सांगितले नाही असे म्हणाल्या. त्यामुळे तहसीलदार यांचे म्हणणे खरे समजावे की जेसीबी चालकाचे खरे समजावे, असा प्रश्न आपसुकच निर्माण होत आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कुणाला, असा प्रश्न सुज्ञ करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणावर लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अवैध वाहतूक करतांना तीन ट्रक सहा ब्रास रेतीने भरलेले आढळले. तीन्ही ट्रक जप्ती करुन ११ लक्ष रुपयांचा दंड केला आहे. भरलेले ट्रक बाहेर निघत नव्हते त्यांना धक्का मारण्यासाठी जेसीबी नेली होती.
-निलीमा रंगारी, तहसीलदार, पवनी
मॅडमनी येनोडाला जेसीबी नेण्याचे सांगीतले. जेसीबीने तीन ट्रकमध्ये रेती भरुन दिली.
-सोमेश्वर पचारे

Web Title: Action on three vehicles smuggling sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.