२० हजार शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:58+5:30

भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला.

20 thousand farmers hit return rains | २० हजार शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

२० हजार शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देदहा कोटींची मागणी : हेक्टरी ८ हजारांचा मदत ठरणार तुटपुंजी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका बसला असून प्रशासनाच्या संयुक्त सर्वेक्षणात केवळ ८ हजार ८०६ हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने घोषित केलेली हेक्टरी ८ हजाराची मदत अगदी तुटपुंजी ठरणार आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा रबी हंगामासाठी सावकाराचा दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.
भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरवर खरीपात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन करुन धान पीक जगविले. त्यानंतर मध्यंतरी जोरदार पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले. धान पीक काढणीची तयारी सुरु असताना दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भाला परतीच्या पावसाचा फटका बसला. शेतात उभा असलेला धान आणि कापणी झालेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतात धान आडवा झाला होता. तर कडप्याला अंकुर फुटले होते. अशा परिस्थितीत शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती.
दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसान जिल्हा केवळ ८ हजार ८०६ हेक्टर धान पिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यातही कोरडवाहू २७०९ हेक्टर आणि बागायती ६०९७ हेक्टर नुकसान झाल्याचे या अहवालात नमुद आहे.
राजकीय अस्थिरतेमुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत घोषित केले.
यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील २० हजार ११६ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र आता हेक्टरी आठ हजार मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी दिसत आहे.
लाखनी, लाखांदूर, साकोली या तीन तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु या शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याची कोणतीही आशा नाही. पीक विमा काढलेले शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहे. परंतु जाचक अटींमुळे मदत पुरेशी मिळण्याची शक्यता नाही. खरीपाचा हंगाम हातचा गेला. आता रबी हंगाम तोंडावर आहे. मात्र अनेक शेतकºयांजवळ रबी हंगामासाठी पैसेच नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

सरसकट मदतीची अपेक्षा
बियाणे आणि मशागतीच्या दरासोबत मजुरीचे दरही वाढले आहे. एकेक कर धान पिकाचा साधारण खर्च २५ हजाराच्या घरात जातो. शासनाने केलेली मदत हेक्टरी असून यामुळे शेतकºयांच्या हाती काहीही उरण्याची शक्यता नाही. गत अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्यां शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा होती. परंतु शासनाने हेक्टर आठ हजार रुपये मदत घोषित करुन शेतकऱ्यांचा तोंडाला पाने फुसली आहेत. यामुळे शेतकऱ्यांत संताप दिसत आहे.

Web Title: 20 thousand farmers hit return rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती