कोरोनाने जिल्ह्यात 1133 मृत्यू; प्रत्येक वारसाला मिळणार 50 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:47+5:30

कोविड १९ च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसानास किंवा निकट नातेवाइकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे निदान क्लिनिकल उपचार कोविड १९ असे झाले होते,  त्याच व्यक्तीचे प्रकरण कोविड १९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.

1133 deaths in Corona district; Each heir will get 50 thousand | कोरोनाने जिल्ह्यात 1133 मृत्यू; प्रत्येक वारसाला मिळणार 50 हजार

कोरोनाने जिल्ह्यात 1133 मृत्यू; प्रत्येक वारसाला मिळणार 50 हजार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाने मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११३३ जणांचा मृत्यू झाला असून या मृतकांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या मदतीपासून कुणीही वारस सुटू नये याची काळजीही जिल्हा प्रशासन घेणार आहे. 
कोविड १९ च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसानास किंवा निकट नातेवाइकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे निदान क्लिनिकल उपचार कोविड १९ असे झाले होते,  त्याच व्यक्तीचे प्रकरण कोविड १९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे. अशा व्यक्तींचा मृत्यू चाचण्यांमधून झाल्याचेही निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद असते. एखाद्या रुग्णाचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोविड १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी या योजनेंतर्गत मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला लाभ देण्यात येणार आहे. कोविड १९ च्या प्रकरणात मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड १९ मुळे झाला आहे असे समजण्यात येणार आहे. तांत्रिक अडचण उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून त्या माध्यमातून प्रस्ताव देता येणार आहे.

ही हवी कागदपत्रे 
- अर्ज दाखल करताना वारसान किंवा नातेवाइकाने अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक, बँक तपशील व मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र व इतर निकट नातेवाइकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यायचे आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रकरण संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप स्वीकृत होणार आहे. 
- सर्व अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यातर्फे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. सर्व मंजूर प्रकरणाची माहितीही उपलब्ध राहणार आहे.

कोविड १९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईक किंवा वारसानास सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने जिल्हा पातळीवर डेटा उपलब्ध करण्यासंदर्भात कारवाई सुरु झाली आहे. आरोग्य विभाग यासाठी विशेष सहकार्य करीत आहे. तांत्रिक कारणामुळे जिल्हा आरोग्य विभागामार्फत ज्यांचे प्रकरण सबमीट होणार नाहीत त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

आठवडाभरानंतर होणार वेबपोर्टल तयार

-  कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसानाला लाभ मिळण्यासाठी शासनाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. यासाठी वेब पोर्टल तयार करण्याची तयारी सुद्धा सुरु झाली आहे. यानंतरच अर्जदार या पोर्टलवर माहितीसह प्रस्ताव सादर करू शकणार  आहेत.

 

Web Title: 1133 deaths in Corona district; Each heir will get 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.