नोकरी, लग्न, आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? तर वैजयंती माळ धारण करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:55 PM2021-11-26T17:55:47+5:302021-11-26T17:56:38+5:30

असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

Want to overcome job, marriage, financial difficulties? So wear Vajyanti Mala! | नोकरी, लग्न, आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? तर वैजयंती माळ धारण करा!

नोकरी, लग्न, आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? तर वैजयंती माळ धारण करा!

Next

ज्याप्रमाणे जन्मकुंडली आणि राशीनुसार रत्न आणि धातू धारण केल्याने फायदे होतात, ग्रह बलवान होतात. त्याचप्रमाणे धर्म आणि ज्योतिष शास्त्रात रुद्राक्ष, तुळशीची माळ अशा गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. ते परिधान केल्याने सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. याचेच एक उदाहरण म्हणजे वैजयंती माळ. ही माळ भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे. 

भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांनी वैजयंतीचा पुष्पहार घालतात. जे भक्त वैजयंतीच्या बीजांपासून बनवलेल्या माळा घालतात त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो. म्हणून अनेक कृष्ण भक्तांच्या गळ्यात वैजयंती माळा बघायला मिळते. त्याचबरोबर ही माळ लक्ष्मीची कारक मानली जाते. त्यामुळे ही माळ धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होतो. ही माला धारण करण्याचे इतरही अनेक फायदेशीर फायदे आहेत. असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

>>वैजयंतीची माळ धारण करायची असल्यास सोमवारी किंवा मंगळवारी धारण करावी. ती माळ एकदा धारण केल्यावर शक्यतो देहापासून विलग करू नये. त्या माळेच्या प्रभावाने जीवनातील नकारात्मकता संपून प्रत्येक कामात यश मिळू लागते.

>>वैजयंती माळ घातल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती सुधारते. 

>>वैजयंती माळ धारण केल्याने मन शांत राहते. क्रोधावर नियंत्रण मिळते. 

>>जे लोक सामाजिक जीवनात खूप सक्रिय असतात, त्यांनीही वैजयंती माळ घालावी. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढते. ही माळ पावित्र्याची खूण असल्यामुळे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही याची जाणीव करून देते. 

>>महिलांनाही वैजयंती माळ घालण्याचा खूप फायदा होतो. त्यांचे मन शांत राहून त्यांना प्रसन्नता अनुभवायास मिळते. 

>>लग्नाला उशीर होत असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी वैजयंतीला माळा धारण करावी. काही दिवसातच जोडीदाराचा शोध संपुष्टात येईल. 

>>जे लोक कला, लेखन किंवा इतर कोणत्याही सर्जनशील कार्याशी निगडीत आहेत, त्यांना ही माळ धारण केल्याने नवीन कल्पना प्राप्त होतील.

>>त्याचबरोबर वैजयंतीचे बीज लक्ष्मी मंत्राने सिद्ध केल्यानंतर ते घर किंवा दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळेदेखील आर्थिक वृद्धी होते. 

Web Title: Want to overcome job, marriage, financial difficulties? So wear Vajyanti Mala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.