देवाला रोज एकच गोष्ट सांगा, 'जे दिले आहेस त्यात मी आनंदी आहे!; असे म्हटल्याने होणारा चमत्कार बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 07:00 AM2022-05-20T07:00:00+5:302022-05-20T07:00:01+5:30

आपण जसे बोलतो, तसे घडत जाते, म्हणून बोलायचेच आहे तर चांगले बोला आणि सकारात्मक बोला असे मानसशास्त्रही सांगते!

Tell God one thing every day, 'I am happy with what you have given me !; Look at the miracle that comes from saying that! | देवाला रोज एकच गोष्ट सांगा, 'जे दिले आहेस त्यात मी आनंदी आहे!; असे म्हटल्याने होणारा चमत्कार बघा!

देवाला रोज एकच गोष्ट सांगा, 'जे दिले आहेस त्यात मी आनंदी आहे!; असे म्हटल्याने होणारा चमत्कार बघा!

googlenewsNext

आजकाल ज्याला बघावे, तो आपल्याच दु:खाचे  तुणतुणे वाजवत फिरतो. प्रत्येकाला आपलेच दु:खं किती मोठे हे सांगण्यात आणि सनानुभूती मिळवण्यात आनंद मिळतो. मात्र, कोणी एक असा भेटत नाही, जो समाधानाने ईश्वराचे आभार मानत म्हणतो, `भगवंता, जे दिले आहेस, त्यात मी आनंदी आहे.' याबाबत ओशो म्हणतात-

सदा दु:खाचे प्रदर्शन करत सहानुभूती गोळा करण्यात काय अर्थ आहे? वेगळ्या तऱ्हेने लोकांचे लक्ष वेधून घ्या ना. हसा! चेहरा प्रसन्न दिसू द्या. रडून आकर्षित करणे हे काही खरे नाही. लोकांकडून सहानुभूती कशाला हवी? ती काही मागण्याजोगी गोष्ट आहे? लोकांकडून प्रेमाची अपेक्षा धरा आणि प्रेम मिळवण्यासाठी आधी प्रेम द्यायला शिका. 

सहानुभूतीची अपेक्षा म्हणजे आजारपण. प्रेम म्हणजे आरोग्य. जेव्हा तुम्हाला प्रेम मिळत नाही, तेव्हा तुम्ही सहानुभूतीसाठी झोळी पसरता. सहानुभूतीलाच प्रेम समजू लागता. खोट्या नाण्याला खरे नाणे म्हणून चलनात आणता. जेव्हा तुम्ही आपल्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करू शकत नाही, तेव्हा कुरुपतेने लोकांची सहानुभूती मिळवू शकता. सौंदर्य आणि कुरुपता या गोष्टी मन, वृत्ती, आचार यांच्याशी संलग्न असतात. कसेही करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधायचे. तुमच्याकडे रसरशीत निरोगीपणा, सक्षमता असेल तर कोण बघणार? याला आपली गरज नाही, असा लोकांच्या मनात विचार येईल. मग आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही असे समजून तुम्ही आजारी होऊन रस्त्यावर पडलात तर लोकांची गर्दी जमते. लोक हळहळतात, सहानुभूती व्यक्त करतात. काहीही कारण असा़े. तुम्हाला वाटते लोकांनी तुम्हाला बघावे. तुम्हाला खास व्यक्ती मानावे. यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. 

मी इथे निरीक्षण करत असतो. हजार तऱ्हेचे लोक माझ्याकडे येतात. त्यांच्यात जे निरोगी वृत्तीचे असतात, सुंदर असतात, वागण्या बोलण्यात सहज स्वाभाविक असतात, त्यांच्याकडेसुद्धा लक्ष वेधले जाते. पण त्यांच्या एकंदर जडण घडणीत रुग्णता नसते. जे मुद्दाम दु:खी झालेत, स्वत:ला दु:खी बनवले आहे, कुरुप झाले आहेत, प्रेमाचे सगळे स्रोत आटून गेले आहेत, त्यांच्याकडेसुद्धा लक्ष वेधले जाते. पण त्यांच्या ध्यान आकर्षून घेण्यात मोठी कुरुपता असते. प्रत्येक उत्सवाच्या वेळी असा आरडा ओरडा करत खाली कोसळणाऱ्या चार पाच स्त्रिया हमखास आढळतात. स्वस्थ निरोगी शरीराच्या, मनानं आरोग्यपूर्ण असणाऱ्या स्त्रिया असे करत नाहीत.

ज्यांच्या जीवनात काही ना काही कला असेल, त्या कलेच्या माध्यमातून ते लोकांचे ध्यान आकर्षून घेतील. त्यांच्या जीवनात काही ना काही कला असेल. त्या कलेच्या माध्यमातून ते लोकांचे ध्यान आकर्षित करतील.

 

मानसशास्त्रज्ञ म्हणतात, की मोठे कलाकार, सृजनशील व्यक्ती, राजनीतिज्ञ आणि अपराधी व्यक्ती यांच्यात फार फरक नसतो. आकर्षित करण्याचे मार्ग मात्र वेगळे असतात. कुणी सुंदर गीत गाऊन लक्ष वेधेल. जो असे सृजन करू शकणार नाही, तो कुणाची हत्या करेल. त्यामुळे वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर येईल. अमेरिकेत एका खुन्याने विनाकारण एका दिवसात सात हत्या केल्या. कारण त्याला आपले नाव वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पहायचे होते.

लक्ष वेधून घेण्यासाठी आपली मानसिकता विकृत बनवायची की सुदृढ हे प्रत्येकाच्या हाती आहे. वाईट गोष्टीतून तुम्ही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल, परंतु तुमच्या व्यक्तीमत्त्वावर त्याच वाईट विचारांची छाप उमटली जाईल. याउलट कष्टपूर्वक तुम्ही निर्माण केलेली कलाकृती, व्यक्त केलेला विचार किंवा अन्य कोणतीही गोष्ट दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील आणि तुम्हाला वारंवार लोकांचे लक्ष वेधून घेण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण लोक तुमच्या चांगुलपणावर लक्ष आणि विश्वास ठेवून असतील.

Web Title: Tell God one thing every day, 'I am happy with what you have given me !; Look at the miracle that comes from saying that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.