आपुलिया हिता जो असे जागता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 06:46 PM2020-05-29T18:46:44+5:302020-05-29T18:47:05+5:30

असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।

Spiritual who lives like this ...! | आपुलिया हिता जो असे जागता...!

आपुलिया हिता जो असे जागता...!

googlenewsNext

  
आपले कल्याण आपल्या हाती  आहे. मानवी जीवनामध्ये हे सर्व काही पुन्हा मिळवता येईल. परंतु मानवी जीवन पुन्हा मिळवू  शकत नाही म्हणून सर्वार्थाने सर्वात मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ते आपले मानवी जीवन आहे.   आपल्या जीवनाला जर सुरक्षित व व्यवस्थित टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टीची मर्यादा, काही गोष्टी चे नियम शिस्त बंधन पाळणे गरजेचे आहे.  आज सर्व जगाला कोरोना या महाभयंकर रोगाने ग्रासले आहे.याचे कारणच मुळी माणसाचे बदलली मनस्थिती व खान पान परिस्थिती बदलली आहे. ती सुधारण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीने पूर्वापार चालत आलेल्या  यम, नियम, योग, प्रत्याहार समाधी या सगळ्या  अष्टांग योग गोष्टीचा अंगीकार केलेला आहे. असे आपणास पहावयास मिळतो. आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की, जो कोणी याचा अंगीकार करणार नाही तो नेस्तनाबूत होणार.  म्हणूनच आज  आपले स्वहित कशामध्ये आहे ते जाणण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर माणसाचे जीवन संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे.
संत तुकाराम या अनुषंगाने म्हणतात
आपुलिया होता जो असे जागता ।धन्य माता पिता जयाचिया।
आपले हिट क्षमध्ये आहे हे ज्यांना कळले त्यांचे आईबाप धन्य आहेत. त्यांची मुलं जबाबदार आहेत समजदार आहेत. नाहीतर सर्व कुळाचाही नाश होऊ शकतो. अशी परिस्थिती आज एक कोरोना विषाणू ने माणसावर आणली आहे.
माणसाने आपल्याला, आपल्या जीवनाला सुरक्षित करण्यासाठी आपण संतांचा विचार अंगीकारावा. जेणेकरून आपले जीवन हे अधिक मौल्यवान होईल. नाहीतर सर्वकाही संपून जाईल. संत तुकाराम महाराज म्हणतात जग हे दिल्या घेतल्याचे आहे-
 जन हे दिल्या घेतल्याचे। अंत काळाचे कुणी नाही ।। म्हणून अनंत काळाचे मित्र कोणीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
 आपली आपण करा सोडवन संसार बंधन सोडा वेगीं।
असे ज्ञानोबा माऊली सांगतात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा संतांचा विचारा संसाराला आधिक सुखी करण्यासाठी समाधानी करण्यासाठी शांततेने जगण्यासाठी अधिक उपयुक्त  आहे. म्हणून सर्वांनी हे जग सुंदर करण्यासाठी आपल्या वागण्याची, बोलण्याची, रहाण्याची, खाण्याची, पिण्याची तऱ्हा, पद्धती बदलणे आवश्यक आहे. नाहीतर मग यम, नियम,आहार, प्रत्याहार,  समाधी  या मुनी पतंजली यांच्या अष्टांग योगाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे .
संतांच्या मते 
अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।
असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।
आपली काळजी जे लोक जीव धोक्यात घालून घेत आहेत. त्यांची काळजी कमी करण्यासाठी आपण घरीच राहून देशहितासाठी नियम पाळणे आवश्यक आहे.
  
-डॉ. हरिदास आखरे, शेगाव

Web Title: Spiritual who lives like this ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.