चांगलंही नाही किंवा वाईटही नाही - केवळ अचल निश्चलता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:55 PM2020-05-07T17:55:35+5:302020-05-07T17:55:45+5:30

जेंव्हा आयुष्य हे आणि ते, चांगले आणि वाईट यामध्ये विभागले जाते, तेंव्हा त्या व्यक्तीला कधीही मौन, शांती, निश्चलता म्हणजे काय हे जाणू शकणार नाही, असे सद्गुरू समजावून सांगतात.

Neither good nor bad just immovable stillness | चांगलंही नाही किंवा वाईटही नाही - केवळ अचल निश्चलता!

चांगलंही नाही किंवा वाईटही नाही - केवळ अचल निश्चलता!

googlenewsNext

जेंव्हा आयुष्य हे आणि ते, चांगले आणि वाईट यामध्ये विभागले जाते, तेंव्हा त्या व्यक्तीला कधीही निश्चलता, मौन, शांती म्हणजे काय हे जाणू शकणार नाही नाही, असे सद्गुरू समजावून सांगतात. हे द्वैत नष्ट करणे हीच योगाची एक मुख्य शिकवण आहे, आणि म्हणूनच भगवान शंकर, म्हणजेच आदियोगी शिव यांना विनाशक म्हणून ओळखले जाते.

 

सद्गुरु: असे काही शिक्षक, गुरु होऊन गेले ज्यांनी लोकांना चांगुलपणाची शिकवण दिली. असे इतरजण होते ज्यांनी लोकांना वाईट गोष्टी शिकवल्या. पण असेही काही गुरु, शिक्षक होते ज्यांनी चांगले आणि वाईट या दोन्हीचा नाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जेणेकरून आयुष्य स्वाभाविकपणे जसे घडायला हवे तसेच घडेल, भलेपणाच्या काही तत्वप्रणालीमुळे किंवा अहंकाराने प्रेरित काही विचार किंवा भावनांमुळे नव्हे. आणि तेंव्हाच एखाद्या व्यक्तीला स्वतःमध्येच शांत, निशब्ध, निश्चल रहाणे म्हणजे काय ते समजू शकतील. चांगली लोकं शांत असू शकत नाहीत. वाईट लोकं शांत असू शकत नाहीत. फक्त या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे पाहू शकणारी लोकं, जे केवळ जीवनाच्या प्रक्रियेकडे लक्ष देतात, तेच खरोखर निश्चल असू शकतात.

केवळ हे आणि हेच

निशब्ध किंवा शांत म्हणजे तुमच्या मनात तुमचेच कोणते विचार सुरू नाहीत. शांतता याचा अर्थ असा नाही की मला पक्षांचा किलबिलाट किंवा सूर्योदयाचा गडगडाट ऐकू येत नाही. निश्चलता, शांती याचा अर्थ केवळ मी विचारांचा कोलाहल थांबवला आहे. सर्व कोलाहल मूलभूतपणे तुम्ही हे आणि ते अशी विभागणी केल्यामुळेच सुरू झाले आहेत. जेंव्हा आयुष्य हे आणि ते असे विभागलेले असते तेंव्हा शांतता, निश्चलता असू शकत नाही. फक्त जेथे हे आणि हेच असते, केवळ तेथेच खरी निश्चलता, शांती असू शकते.

 

सर्वत्र, हा एकच प्रश्न विचारला जातो: “मी किती अध्यात्म करावे? तुम्ही कितीही केले, तरीसुद्धा तुम्ही संकटात सापडाल. तुम्ही फक्त हे आणि हेच करणे आवश्यक आहे. इतर सर्व गोष्टी त्यामध्येच बसायला हव्यात, तरच सर्वकाही ठीक होईल. तुम्ही जर हे आणि ते करण्यात गुरफटलात, तर संकटात सापडाल – त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्यांनी लोकांना भलेपणा शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी हा मार्ग निवडला कारण त्या विशिष्ट काळात समाज अशा विचलन आणि अवनतीच्या स्थितीत होता की सामाजिक परिस्थितीमध्ये थोडीफार सुसंगती आणण्यासाठी आणि लोकांना ते ज्या स्थितीत अडकून पडले आहेत त्यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी लोकांना केवळ विरुद्ध प्रकारची शिकवण दिली.

जेंव्हा “खुनाचा बदला खून” अशी शिकवण देणारे लोकं होते, आणि एखादा मनुष्य येऊन म्हणाला की “तुम्हाला एका गालावर चापट मारली, तर तुम्ही त्याच्यासमोर दूसरा गाल पुढे करा.” तर ते सांगणे केवळ लोकांना त्यांच्या बंधंनातून मुक्त करण्यासाठीच होते. त्यांनी जर त्यांना थोडे अधिक जगू दिले असते, तर त्यांनी लोकांना गरज भासल्यास समोरच्या माणसाच्या थोबाडीत कसे मारावे हे देखील शिकवले असते. किंवा कदाचित त्यांनी खरोखरच आवश्यक होते, तेवढेच शिकवले असेल. इतर गोष्टी लोकांनी शिकून घेतल्याच असत्या.



चांगले आणि वाईटाच्या कल्पना

चांगुलपणाची प्रत्येक कल्पना फक्त पूर्वग्रहाच्या वेगवेगळ्या पातळ्या वाढवते. एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीला चांगले म्हणालात, की दुसरी गोष्ट वाईट ठरते, आणि आपली धारणा संपूर्णपणे बिघडुन जाते. तुम्हाला त्यापासून अलग होण्याची कोणतीही संधी मिळत नाही. मग तुम्ही कितीही कठोर झालात, तरीही ते तसेच भासेल. याचा नाश करण्यासाठी, आम्ही योगाची निर्मिती केली. आणि म्हणूनच शिव, योगाचे पहिले शिक्षक, विनाशक म्हणून ओळखले जातात. योगाची संपूर्ण कल्पनाच सुरूवातीला चांगल्या वाटणाऱ्या पण नंतर अडचणीत टाकणार्‍या गोष्टींचा नाश करणे आहे.

जेंव्हा शिवाने योगाचे सविस्तर विश्लेषण दिले, तेंव्हा त्यांनी तो अनेक मार्गांनी उपलब्ध करून दिला. एका स्तरावर, ते म्हणाले की हे खूप निकट आहे. त्याने पार्वतीला सांगितले, तू फक्त माझ्या मांडीवर बस, तुझ्यासाठी हाच योग आहे.”ही एखाद्या पुरुषाची स्त्रीने त्याच्या मांडीवर बसविण्याची युक्ती वाटते. पण ते तसे नाही, त्यांनी तिला केवळ मांडीवर घेतले असे नाही. त्यांनी स्वतःचा अर्धा भाग तिला दिला आणि तिला आपलाच एक भाग बनवले. जेंव्हा तिने सर्व प्रकारचे प्रश्न विचारले, तेंव्हा ते म्हणाले, “तू काळजी करू नकोस, तू फक्त येथे बस. फक्त माझ्या मांडीवर बस, बाकी सर्व मी पाहून घेईन.” पण इतर काहीजणांना त्यांनी विस्तृत पद्धती शिकवल्या, सत्य जणूकाही लक्षावधी मैल दूरवर आहे आणि तेथपर्यंत पोहोचण्यासाठी लक्षावधी गुंतागुंतीची पावले कशी उचलावी लागतील यावर ते बोलले. एकच मनुष्य दोन्ही मार्गांनी बोलतो.

सत्याचे निराकरण करण्याची गरज नाही

हा सर्वात सुंदर भाग आहे – शिव सत्याचे निराकरण करत नाहीत, ते त्यांच्यासमोर बसलेल्या लोकांचे निराकरण, समाधान करतात, कारण सत्याचे निराकरण करता येऊ शकत नाही आणि त्याची आवश्यकता सुद्धा नाही. जगाने हीच मोठी चूक केली आहे. त्यांनी सतत परम तत्वाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांचे कधीही निराकरण, समाधान केले नाही. त्यांनी नेहेमीच देवाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला, जो त्यांच्या परम तत्वाची कल्पना आहे. ज्या क्षणी तुम्ही परम तत्वाचे निराकरण करता, तेंव्हा तुम्ही सर्व प्रकारच्या काल्पनिक विकृतींमध्ये गुरुफटले जाता.

योग प्रणाली कधीही परम तत्वाचे निराकरण करत नाही. ती केवळ लोकांचे निराकरण करते. परम तत्वाचे काहीही करण्याची आवश्यकता नाही – ते कसेही परम तत्व आहे. सध्या जो सीमित मर्यादांच्या विशिष्ट अवस्थेत आहे त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात, तर त्यांनी तुम्हाला तपासणे अपेक्षित असते. त्यांनी डोळे मिटून तुमच्यासाठी प्रार्थना करणे अपेक्षित नसते. तुम्ही त्यासाठी त्यांच्याकडे गेला नाहीत. त्यांनी तुम्हाला तपासून तुम्हाला काय आजार जडला आहे हे शोधून काढणे अपेक्षित आहे.

त्याच प्रमाणे, लोकं अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. परम तत्व काही धडपड, संघर्षरत नाहीये. वैयक्तिक माणसं संकटं आणि पेचप्रसंगांमध्ये गुरफटलेली आहेत. आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक लहान सहान गोष्टीमुळे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात उलथापालथ होते आहे. या सर्वसामान्य माणसाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याला सध्या तो जसा आहे त्यानुसार त्याचे निराकरण करणे हेच योग विज्ञानाचे सार आहे, परम तत्वाचे निराकरण करणे नव्हे.

Web Title: Neither good nor bad just immovable stillness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.