२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:31 IST2025-12-02T19:27:16+5:302025-12-02T19:31:12+5:30

Margashirsha Purnima 2025: २०२५ ची शेवटची मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवारी आली असून, या दिवशी केलेली लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण शुभ पुण्याचे ठरू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

margashirsha purnima 2025 should do these 3 things on last purnima of 2025 and mahalakshmi will bless you and will prosper | २०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!

२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!

Margashirsha Purnima 2025: २०२५ चा शेवटचा डिसेंबर महिना सुरू आहे. अवघ्या काही दिवसांनी २०२५ या वर्षाची सांगता होणार आहे. मराठी वर्षानुसार अत्यंत शुभ आणि अनन्य साधारण महत्त्व असलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा २०२५ मधील शेवटची पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो. यंदा हा दिवस गुरूवारी आल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्गशीर्ष गुरूवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रत करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. जे हे व्रत करतात किंवा ज्यांना असे व्रत करणे शक्य होत नाही, त्यांनी गुरूवारी येत असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमेला काही गोष्टी आवर्जून कराव्यात असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

यंदा, गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ३७ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होत असून, उत्तर रात्रौ ०४ वाजून ४३ मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना म्हणूनही सांगितला जातो. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. 

गुरूवारी मार्गशीर्ष पौर्णिमा, लक्ष्मी उपासना अवश्य करा

संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना केली आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. चंद्रोदयानंतर मध घातलेले दूध चंद्राला अर्पण करावे. चंद्राच्या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने धन-धान्याची कमी भासणार नाही. कुंडलीतील चंद्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकेल, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. यंदा गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमा आल्यामुळे लक्ष्मी देवीची काहीतरी उपासना नक्की करावी, असे सांगितले जात आहे. 

मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी-नारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व

मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी स्नानादि कार्ये उरकल्यानंतर आपापले कुळधर्म, कुळाचार आणि कुळपंरपरेनुसार देवीची पूजा करावी. शास्त्रशुद्ध पूजा करणे शक्य नसेल तर केवळ पंचोपचार पूजा करावी, असे सांगितले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी-नारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे आवर्जून म्हणावीत. शक्य असेल तर विष्णूसहस्रनाम म्हणावे, असे सांगितले जाते. 

- पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदी किंवा इतर कोणत्याही पवित्र नदी किंवा तलावात स्नान करणे शुभ मानले जाते.

- मार्गशीर्ष पौर्णिमेला शक्य असेल, तर श्रीसुक्त अवश्य म्हणावे. पौर्णिमेच्या रात्री श्रीसुक्त पठण करणे अत्यंत शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. 

- देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. कमळ हे लक्ष्मी देवीचे आवडते फूल मानले जाते. म्हणून, कमळाचे फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात समृद्धी येते, असे म्हटले जाते.

- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः चंद्र देवाचे दर्शन घेतले पाहिजे. पौर्णिमेला चंद्राची पूजा केल्याने मन संतुलित आणि शांत राहते असे मानले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title : 2025 की अंतिम पूर्णिमा: लक्ष्मी की कृपा पाने के लिए करें ये 3 काम

Web Summary : 2025 की अंतिम मार्गशीर्ष पूर्णिमा विशेष शुभ है। लक्ष्मी-नारायण की पूजा करें, चंद्रमा को दूध अर्पित करें और समृद्धि के लिए श्री सूक्त का पाठ करें। इस गुरुवार का विशेष महत्व है। इन कार्यों को करने से आशीर्वाद और प्रचुरता मिलती है, और बाधाएं दूर होती हैं।

Web Title : 2025's Last Purnima: Do These 3 Things for Lakshmi's Blessings

Web Summary : Margashirsha Purnima, the last of 2025, is especially auspicious. Worship Lakshmi-Narayan, offer milk to the moon, and recite Shree Sukta for prosperity. This Thursday holds special significance. Performing these acts brings blessings and abundance, removing obstacles.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.