Maghi Ganesh Jayanti 2021: 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची पूजा; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व मान्यता

By देवेश फडके | Published: February 14, 2021 07:52 PM2021-02-14T19:52:58+5:302021-02-14T19:54:22+5:30

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. (Maghi Ganesh Jayanti Puja Vidhi In Marathi)

maghi ganesh jayanti 2021 know about date shubh muhurat puja vidhi and significance of shri ganesh jayanti | Maghi Ganesh Jayanti 2021: 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची पूजा; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व मान्यता

Maghi Ganesh Jayanti 2021: 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची पूजा; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व मान्यता

googlenewsNext

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. (Maghi Ganesh Jayanti Puja Vidhi In Marathi)

गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते. यापैकी एक म्हणजचे माघी गणेश जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले जाते. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाचा वध केला. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला, तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक अर्पण करायचे असतात. 

माघ शुद्ध चतुर्थी (श्रीगणेश जयंती) : सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१

माघ शुद्ध चतुर्थी प्रारंभ : रविवार, १४ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ०१ वाजून ५९ मिनिटे.

माघ शुद्ध चतुर्थी समाप्ती : सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ३६ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्रीगणेश जयंती १५ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. 

माघी गणेश पूजन विधी

सर्वप्रथम सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर माघी गणेश पूजाविधीचा संकल्प करावा. गणपतीची एका चौरंगावर स्थापना करावी. गणपती बाप्पाचे आवाहन करावे. षोडशोपचार पूजा करावी. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. तर, माघी गणेश पूजनावेळी तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती तीलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १९३१ साली नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साधारणपणे १२० ते १२२ सार्वजनिक तसेच ५०० ते ६०० घरगुती माघी गणपतींची स्थापना करण्यात येते.

Web Title: maghi ganesh jayanti 2021 know about date shubh muhurat puja vidhi and significance of shri ganesh jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.