भगवान विष्णूंनी मत्स्यावतार हा पहिला अवतार घेतला होता, तो आजचाच दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:04 PM2021-04-17T12:04:12+5:302021-04-17T12:04:39+5:30

आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल. 

Lord Vishnu had taken the first Avtar is Matsyavatar, that is today! | भगवान विष्णूंनी मत्स्यावतार हा पहिला अवतार घेतला होता, तो आजचाच दिवस!

भगवान विष्णूंनी मत्स्यावतार हा पहिला अवतार घेतला होता, तो आजचाच दिवस!

Next

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, चैत्र शुक्ल पंचमी या तिथीला मत्यजयंतीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले आहे. तरीही पां.वा. काणे यांनी चैत्र शुक्ल पंचमीला मत्स्यजयंती करतात असे म्हटले आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मत्स्यावताराची पूजा केली जाते. त्यामुळे संकट निवारण होते अशी समजूत आहे. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. हैग्रीव नावाच्या असुराला मारण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता. 

याच तिथी  पंचमहाभूतांची पूजा तसेच शंख, चक्र, गदा, पद्म आणि पृथ्वी यांच्या आकृत्या काढून त्यांची पंमूर्तीव्रत म्हणून पूजा केली जाते. शिवाय विष्णुप्रतिमेला हिंदोळ्यावर ठेवून झोके देण्याचा विष्णु-दोलोत्सवही काही ठिकाणी साजरा केला जातो. एकूणच ही तिथी लक्ष्मी आणि अधिककरून विष्णूंशी संबंधित आहे. 

या सर्व व्रतांमागे कामनापूर्ती, वैभवप्राप्ती अशा फललाभांचे सूचन केलेले असले, तरीही ही फळे विष्णुभक्तीपुढे गौण आहेत. मनाला आनंद मिळावा, शांतता मिळावी यासाठी ज्याने त्याने आपापल्या इच्छाशक्तीनुरूप ही व्रते केली तर काहीच हरकत नाही. या व्रतांमुळे आनंदाचे चार क्षण गाठीशी बांधले जातील हे नक्की. 

या दिवशी माशांना पीठ घालावे किंवा खाद्य टाकावे. भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून नदी, समुद्र, जलाशय, झरा, धबधबा असे पाण्याचे आणि जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल. 

Web Title: Lord Vishnu had taken the first Avtar is Matsyavatar, that is today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.