लोकमत भक्ती चॅनेलवर Live - 'विश्वमानवाला तारणार कोण-देव की विज्ञान?'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 09:20 AM2020-04-30T09:20:07+5:302020-04-30T10:57:52+5:30

लोकमतच्या भक्ती या युट्यूब चॅनेलवर आज गुरुवार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता 'विश्व मानवाला तारणा कोण - देव की विज्ञान' यासंदर्भातील मार्गदर्शनपर चर्चा पाहायला मिळेल.

On Lokmat Bhakti Channel Live - 'Who will save the world - God or science?' MMG | लोकमत भक्ती चॅनेलवर Live - 'विश्वमानवाला तारणार कोण-देव की विज्ञान?'

लोकमत भक्ती चॅनेलवर Live - 'विश्वमानवाला तारणार कोण-देव की विज्ञान?'

googlenewsNext

मुंबई - कोरोनाविरुद्ध गेल्या २ महिन्यांपासून भारतीयांची लढाई सुरु असून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी काही वेळेची सवलत नागरिकांना देण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील प्रत्येक नागरिक आपलं योगदान दे आहे. मात्र, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी आणि पोलीस प्रशासना रात्रंदिवस राबताना दिसत आहे. प्रत्येकजण कोरोनाबाबतच बोलत आहे, जिकडे तिकडे त्याचीच चर्चा आहे. तर, देशातील मंदिरेही  बंद झाली आहेत. तर, रुग्णालये २४ तास सेवा देत आहेत. हाच विषय घेऊन लोकमतच्या भक्ती युट्यूब चॅनेलवर प्रल्हाद वामनकर पै आणि स्नेहलता वसईकर मार्गदर्शनपर चर्चा करणार आहेत.  

लोकमतच्या भक्ती या युट्यूब चॅनेलवर आज गुरुवार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता 'विश्व मानवाला तारणा कोण - देव की विज्ञान' यासंदर्भातील मार्गदर्शनपर चर्चा पाहायला मिळेल. सध्या, लॉकडाऊनचा सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय क्षेत्रावर पडला आहे. तरीही, ते ऑन ड्युटी २४ तास सेवा देत आहेत. आज देशातील मंदिरे बंद असल्याने अनेकांनी देव कुठं गेला, विज्ञानच मदतीला धावले असे म्हणत देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र, आज रुग्णालयातील पांढऱ्या पोशाखात आणि रस्त्यावरील खाकी वर्दीत देवच आहे. मंदिरे बंद झाली तरीही, देवाचं कार्य बंद नाही. आपल्या गरिब भक्तांसाठी मंदिराची दानपेटी आज खुली झालीय, हजारोंना तेथून अन्नप्रसाद मिळतोय, असं सागून देवाचं अस्तित्व नाकारता येत नाही, असेही अनेकांकडून पटवून देण्यात येत आहेत.  

कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देऊन कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय, पोलीस, सफाई कामगार, ड्रायव्हर, शेतकरी यांचे आभार मानून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस लोकमत भक्ती युट्यूब चॅनेलचा आहे. त्यामुळेच, कोरोनाच्या लढाईत विश्व मानवाला तारणार कोण - देव की विज्ञान या विषयावर आज गुरुवारी सायंकाळी ८.३० वाजता चर्चासत्र आहे. दर्शकांना या चर्चासत्रातून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधता येतील. 

Web Title: On Lokmat Bhakti Channel Live - 'Who will save the world - God or science?' MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.