Leo Features: राजेशाही थाट, नेतृत्त्वाचे गुण आणि स्वभावात करडेपणा; असे असतात सिंह राशीचे लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:24 AM2022-05-18T11:24:06+5:302022-05-18T11:24:29+5:30

Leo Features: सिंह या नावातच राजपद आणि हुकूमशाही असल्याचे लक्षात येते. हाच स्वभाव असतो या राशीच्या लोकांचा, त्याबरोबरच असतात अनेक चांगले वाईट गुण, कोणते ते पाहू. 

Leo Features: Monarchy, leadership qualities and strict nature; Such are the people of Leo zodiac sign! | Leo Features: राजेशाही थाट, नेतृत्त्वाचे गुण आणि स्वभावात करडेपणा; असे असतात सिंह राशीचे लोक!

Leo Features: राजेशाही थाट, नेतृत्त्वाचे गुण आणि स्वभावात करडेपणा; असे असतात सिंह राशीचे लोक!

googlenewsNext

सिंह राशीचे लोक संयमी आणि उदार तसेच शूरवीर असतात. त्यांना दुसऱ्यांवर अधिकार गाजवायला आवडतो. हाती घेतलेले काम ते मनापासून पूर्ण करतात. ते आपल्या दुःखाचे प्रदर्शन कधीच करत नाहीत. 

सिंह राशीला सर्वांवर वर्चस्व गाजवायचे असते. सिंह रास अगदी सिंहासारखी. स्वतःला राजा समजणारे हे लोक हुकूमत गाजवण्यात पुढे असतात. लोकांनी त्यांचे ऐकावे असे त्यांना वाटते. त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते रागवतात, अबोला धरतात. थोडे तापट स्वभावाचे असतात. मात्र कामाच्या नियोजनाबाबत अगदी काटेकोर असतात.  आपल्या कष्टाने आणि स्वभावाने ते आपापल्या क्षेत्रात वरिष्ठ पद भूषवतात. 

सिंह राशीत जन्मलेले लोक दिसायला आकर्षक असतात. त्याचे खांदे रुंद, डोळे सुंदर आणि बोलके असतात. हे लोक त्यांचे भाव डोळ्यांद्वारे प्रकट करतात. चेहऱ्यावर थोडा स्वभावातला करडेपणा दिसून येतो. म्हणून सहसा त्यांच्याशी कोणी पटकन बोलायला जात नाही. 

या राशीच्या लोकांनां खोटे बोललेले, फसवलेले चालत नाही. असे कृत्य करणाऱ्या लोकांशी त्यांचे पटत नाही. त्यांच्यापासून हे लोक चार हात दूर असतात. यांचे सहसा कोणाशी पटत नाही. व्यक्तीची पारख करून मगच ते मैत्री करतात आणि एकदा जोडलेले नाते दीर्घकाळ टिकवतात. 

सिंह राशीचे लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रसंगी दुसऱ्यांचा वापरही करतात. इतरांवर भावनिक दबाव आणतात. स्वतः देखील सचोटीने एखादी गोष्ट पूर्णत्त्वास नेतात. मात्र कुरघोडी करून यश मिळवण्यावर त्यांचा कल दिसून येतो. ते पटकन भावनाविवश होत नाहीत. विचारपूर्वक निर्णय घेतात. कला, संगीत, नाटक, सिनेमा या क्षेत्रांतमध्ये करिअर करण्यात त्यांना विशेष रस असतो. 

सिंह राशीचे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात. दुःखावर मात करण्याची त्यांच्यात क्षमता असते. हे लोक सदैव आनंदी राहणे पसंत करतात. कितीही गरिबी असू दे, त्यातही ते राजेशाही थाटात वावरतात. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीचे लोक खूप निष्ठावंत आणि विश्वासार्ह असतात. असे लोक रूढीवादी असतात आणि परंपरांवर विश्वास ठेवतात. अध्यात्माकडे त्यांचा कल दिसून येतो. आयुष्याच्या उत्तरार्धात ते अनेकदा अयशस्वी ठरतात कारण त्यांच्या अपेक्षा आणि आशा जास्त असतात, ज्यासाठी ते सतत धडपडत असतात. 

सिंह राशी कालपुरुषाच्या कुंडलीच्या पाचव्या घरात येते आणि पाचवे घर मुलांचे, जन्मजात ज्ञान आणि बुद्धीचे आहे. या लोकांच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल तर अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते. अशा व्यक्तीला करिअर मध्ये चांगले पद मिळू शकते. भाग्याचा स्वामी आणि आरोही सूर्याचा उत्तम मित्र मंगळ असल्यामुळे या राशीच्या लोकांना खूप चांगले फळ मिळते. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, जो या राशीला शुभ फल देतो, म्हणून सूर्य हा अग्रस्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांनी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे. या राशीच्या लोकांनी माणिक धारण करावे. भाग्याचा स्वामी मंगळ त्यांच्यासाठी मंगलकारक ठरेल. 

Web Title: Leo Features: Monarchy, leadership qualities and strict nature; Such are the people of Leo zodiac sign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.