चिंताग्रस्त आहात का? व्यवस्थितपणे बसायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:17 AM2020-04-22T10:17:22+5:302020-04-22T10:27:05+5:30

समस्या फक्त हीच आहे – तुमचे आरोग्य तुमच्या हाताबाहेर चालले आहे, मग कारण कोणतेही असो.

Good posture is important for your health as well as you appearance SSS | चिंताग्रस्त आहात का? व्यवस्थितपणे बसायला शिका!

चिंताग्रस्त आहात का? व्यवस्थितपणे बसायला शिका!

Next

सद्गुरू, मी सतत चिंतेनं ग्रासलेला असतो. असे का घडते आणि मी ते कसे नियंत्रणात ठेवू शकतो?

सद्गुरु - मानसिक स्वास्थ्य ही एक संवेदनशील गोष्ट आहे... जेव्हा शारीरिक स्वास्थ्याचा प्रश्न येतो, जर तुम्हाला कुठल्या बाह्य गोष्टींचा संसर्ग झाला नसेल, तर इतर सर्व आजार आपल्या आतमधूनच निर्माण होतात. जे तुमच्या आतमधून येत आहे, ती तुमची जबाबदारी आहे का? जर तुमचे शरीर आतमधून आजार निर्माण करत असेल, तर त्यावर उपाय करायची जबाबदारी तुमची आहे का?

दुपारपर्यंत एखाद्या बटाट्यासारखे पलंगावर पडून राहणार्‍या लोकांना अनेक आजार जडलेले असतात हे खरे नाही का? सकाळी 5 वाजता उठून पळायला, पोहायला खेळायला जाणारे किंवा इतर काही करणारे लोकं मूर्ख असतात असे त्यांना वाटते. त्यांना असे वाटते की फक्त खाऊन पिऊन आणि लोळून ते खरोखरच आयुष्याची मजा लुटत आहेत. पण काही काळानंतर, तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. आणि मग स्वतःची तब्येत ठीक नसताना एखाद्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असणे हा त्याच्या नशिबाचा भाग आहे असे त्यांना वाटते. नाही! आरोग्य तुमच्या आतून निर्माण केले जाते. संसर्गाच्या माध्यमातून बाहेरून कोणते आक्रमण झाले असेल तर ती वेगळी बाब आहे.

समस्या फक्त हीच आहे – तुमचे आरोग्य तुमच्या हाताबाहेर चालले आहे, मग कारण कोणतेही असो.

जेव्हा मानसिक आरोग्याचा प्रश्न येतो, असे बोलणे खूपच संवेदनशील आहे, परंतु तरीसुद्धा – तुमच्या शरीराला काही होणे ही जर तुमची जबाबदारी असेल, तर तुमच्या मनाला जर काही होत असेल तर ती देखील तुमचीच जबाबदारी नाही का? त्यात अनेक घटकांचे योगदान असू शकते. अगदी शारीरिक आजार सुद्धा अनेक घटकांमुळे उद्भवलेले असू शकतात. हे मानसिक आजारांबाबत सुद्धा असेच असू शकते. पण आपण मानसिक आजार आणि क्लेश/दुःख याकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या क्लेश/दुःखावर उपचार करून घेऊ शकत नाही; कदाचित ते सुद्धा दुःखी असू शकतील.

तुम्ही जर वैद्यकीयदृष्ट्या आजारी असाल, तर औषधांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आजारावर काही प्रमाणात उपाय करू शकता, जे रसायनशास्त्राशी संबंधित आहे. पण रसायनांचा सर्वात अत्याधुनिक कारखाना इथेच आहे. (मानवी शरीरात) समजा तुमचे आरोग्य तुमच्या हातात असते, तर तुम्ही चिंता किंवा आनंद यापैकी कशाची निवड केली असती? नक्कीच, आनंद हीच तुमची निवड असती, आनंदाची सर्वोच्च पातळी गाठण्याची.

समस्या फक्त हीच आहे – तुमच्या शरीराची रासायनिक क्रिया तुमच्या हाताबाहेर चालली आहे, मग कारण कोणतेही असो. अनुवंशिक कारणे असू शकतात, संसर्ग असू शकतो, बाह्य उत्तेजके असू शकतात, अनेक कारणे आहेत. पण तरीसुद्दा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी नाही का? ज्या क्षणी ही जबाबदारी माझी नाही असा विचार तुम्ही करायला लागता – तेंव्हा ते तुमच्या हातातून पुर्णपणे निसटते. ही तुमची जबाबदारी आहे असा विचार तुम्ही केलात, तर उद्या सकाळपर्यंत कदाचित सर्व आजारांवर उपाय मिळणार नाहीत, पण तुम्ही स्वास्थ्याच्या दिशेने प्रवास सुरू करू शकाल.

 हे अतिशय महत्वाचे आहे – तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही काय नाही, याची जबाबदारी तुमच्याकडेच असायला हवी. हे माझे मूलभूत ध्येय आहे: धर्मातून जबाबदारीपर्यन्त. धर्म म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणार्‍या चुकीच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी वर स्वर्गात आहे असा गैरसमज. समस्या अशी आहे की तुम्ही एका गोल ग्रहावर आहात आणि तो गोलगोल फिरतो आहे. विश्वात कोठेही “ही वरची बाजू आहे” असे लिहून ठेवलेले नाही. तुम्हाला वरची बाजू कोणती हे सुद्धा माहिती नसेल, तर अपरीहार्यपणे, तुम्ही चुकीच्या दिशेलाकडेच नजर ठेवता.

 

Web Title: Good posture is important for your health as well as you appearance SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.