भडक शीर्षक, सनसनाटी चित्रणं नि प्रक्षोभक वर्णनं अशी रोगट स्पर्धा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:19 AM2020-05-02T02:19:51+5:302020-05-02T02:20:38+5:30

हजार फटाक्यांची माळ एका फाटाक्यानं पेटते नि मग काहीवेळ नुसतं कर्णकटू ठो ठो आणि फाट फाट, त्याचबरोबर विषारी धूर आजूबाजूचं वातावरण ग्रासणारा.

The disease competition started with flashy titles, sensational depictions and provocative characters | भडक शीर्षक, सनसनाटी चित्रणं नि प्रक्षोभक वर्णनं अशी रोगट स्पर्धा सुरू

भडक शीर्षक, सनसनाटी चित्रणं नि प्रक्षोभक वर्णनं अशी रोगट स्पर्धा सुरू

Next

- रमेश सप्रे
यापूर्वी अनेक विषाणूंना मानवानं यशस्वीपणे तोंड दिलंय. त्यासाठी काही किंमतही मोजली आहे. पण यावेळचं प्रकरण नि प्रकार काही निराळाच दिसतोय. हजार फटाक्यांची माळ एका फाटाक्यानं पेटते नि मग काहीवेळ नुसतं कर्णकटू ठो ठो आणि फाट फाट, त्याचबरोबर विषारी धूर आजूबाजूचं वातावरण ग्रासणारा.
विषाणूच्या प्राणघातक प्रसारासंबंधी एवढ्या उलट सुलट, अतिरंजित, भ्रम पसरवणाऱ्या, अफवा असणाºया इतक्या गोष्टी दूरचित्रवाणीच्या अनेकानेक वृत्तवाहिन्यांवरून नि व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून पसरवल्या जाताहेत की कुणाचाही चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू व्हावा.
इथंही ‘वेचक-वेधक’ हे सूत्र वापरलं तरच निभाव लागू शकेल. भडक शीर्षक, सनसनाटी चित्रणं नि प्रक्षोभक वर्णनं यात जी रोगट स्पर्धा सुरू आहे त्यातून आपणच विचार करून, खºया माहितगार व्यक्ती वा जबाबदार संस्थांकडून आवश्यक ती मार्गदर्शनपर माहिती मिळवणं आवश्यक बनलंय.
वेचून काढण्याच्या कृतीला वेचणूक असं म्हणतात. यात खरं-खोटं, योग्य-अयोग्य, साधक-बाधक, तारक-मारक अशा गोष्टीतून हितकारक, कल्याणकारी जे असेल ते वेचून काढायचं असतं. यासाठी हवी असते विवेक बुद्धी. तिचं शिक्षण मुलांना लहानपणापासूनच घरी नि शाळेत दिलं गेलं पाहिजे. यासाठी मुलांना विविध पर्याय असलेले दैनंदिन जीवनातील प्रश्न विचारले पाहिजेत. पुढे मोठं झाल्यावर समाजासमोरील समस्यांनी अनेक अंगांनी चर्चा केली पाहिजे, काहीतरी नवी दिशा दाखवणारे वादविवाद आयोजित करायला हवेत. त्यातून त्या प्रश्नांचा वेध घेण्याची नि योग्य ते वेचण्याची सवय मुलांना लागेल.
आपल्या जीवनात आपल्या चौरस्त्यांवर (क्रॉसरोड्स) आणणाºया घटना नेहमी घडत असतात. निश्चित कोणता रस्ता निवडायचा याचा निर्णय करणं खूप महत्त्वाचं असतं. सध्याची एकूण समाजस्थिती पाहिली तर ‘उडदामाजी काळेगोरे। काय वेचणार वेचणारे?।’ अशी अवस्था आहे.

Web Title: The disease competition started with flashy titles, sensational depictions and provocative characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.