चंपक द्वादशी : आज भगवान विष्णूंना एक तरी चाफ्याचे फुल अवश्य वहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:00 AM2021-06-22T08:00:00+5:302021-06-22T08:00:02+5:30

द्वादशी ही तिथी भगवान विष्णूंची तिथी आहे. या मासात चाफ्याची फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ते फुल जसे आपल्याला हुंगायला किंवा केसात माळायला आवडते, तितक्याच रसिकतेने ते देवालाही अर्पण करावे.

Champak Dwadashi: Today, Lord Vishnu must have at least one champa flower! | चंपक द्वादशी : आज भगवान विष्णूंना एक तरी चाफ्याचे फुल अवश्य वहा!

चंपक द्वादशी : आज भगवान विष्णूंना एक तरी चाफ्याचे फुल अवश्य वहा!

googlenewsNext

ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या भगवंतालाही आवडत असाव्यात, असा भोळा आणि शुद्ध भाव मनी ठेवून आपण देवाला प्रत्येक गोष्ट श्रद्धेने अर्पण करतो. त्यासाठी आपल्या व्रत वैकल्यांची सुद्धा विशेष रचना केली आहे. जेणेकरून आपण निसर्गाच्या सान्निध्यात जावे आणि प्रत्येक प्राणीमात्रात भगवंत पाहावा आणि या जीव सृष्टीचा आदर करावा. अशाच भावनेने आजचे चंपक द्वादशीचे व्रत केले जाते. या व्रतासाठी काही विशेष उपचार, पूजा किंवा उपास करायचा नसून  केवळ चाफ्याचे फुल भक्तिभावाने देवाला समर्पित करणे अपेक्षित असते. 

द्वादशी ही तिथी भगवान विष्णूंची तिथी आहे. या मासात चाफ्याची फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ते फुल जसे आपल्याला हुंगायला किंवा केसात माळायला आवडते, तितक्याच रसिकतेने ते देवालाही अर्पण करावे. या तिथीला भगवान विष्णूला कृष्ण स्वरूपात गोविंद नावाने पूजा करून चाफ्याचे फुल वाहिले जाते. 

चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, सोनचाफा, पिवळा चाफा, कवठी चाफा, नागचाफा, हिरवा चाफा, तांबडा चाफा, भुई चाफा इ. पैकी आपल्या सभोवतालच्या परिसरात पांढरा चाफा सहज आढळतो. पिवळा चाफा फुलवाल्यांकडे हमखास मिळतो. बाकी प्रकारचा चाफा थोडा दुर्मिळ असतो. त्याची विशेष लागवड करावी लागते. या व्रताच्या निमित्ताने आपल्यालाही चाफ्याचे रोप लावण्याचा संकल्प सिद्धीस नेता येईल. 

चाफा नुसता आकर्षक किंवा सुगंधी नाही, तर अनेक आजारांवर गुणकारीदेखील आहे. चाफ्याचे फुलाचा सुगंध घेतल्यास हृदय आणि बुद्धी तल्लक होते कारण चाफ्याचे फूल हे शीतल प्रवृत्तीचे असून हृदयासाठी उपयुक्त मानले जाते. तुमचे पोट साफ होत नसेल तर चाफ्याच्या फुलांचा रस काढून तो तीन मिली घेऊन मधासोबत रोज रात्री घ्यायचे आहे. पूर्ण पोट साफ होते तसेच चाफ्याचे फूल मधामध्ये एकत्र करून खाल्ल्यास ताकद मिळते डोकेदुखीचा त्रास प्रत्येकाला होत असतो तर या साठी चाफ्याच्या तर मग आज आपन फुलांचा अर्क किंवा रस तिळाच्या तेलात दोघ एकत्र करून अर्धा चमचा करून तो लेप डोक्याला लावा. नंतर  एखादा रूमाल किंवा कपडा बांधा. डोकेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद होतो. गुडघे दुखी किंवा सांधेदुखी असेल तर चाफ्याच्या फुलांच्या तेलाने मालीश केल्यास चांगल्या पैकी आराम मिळतो. पोट दुखत असेल तर चाफ्याच्या पानांचा रस १० मिली घेऊन २० ग्रॅम मधात एकत्र घेऊन सकाळ, संध्याकाळ घेतल्यास आराम मिळतो. चेहरा तसेच त्वचा चमकदार आणि स्वच्छ होण्यासाठी चाफ्याच्या फलाचा रस लिंबाच्या रस किंवा पाण्यात एकत्र करून लावल्यास खूप फरक पडतो व तसेच चाफ्याच्या फुलांचा लेप त्वचेच्या कुठल्याही समस्येवर लावल्यास छान आराम मिळतो.

Web Title: Champak Dwadashi: Today, Lord Vishnu must have at least one champa flower!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.