पतीसोबत कारमध्ये भलतीच बाई... पत्नीने केली भररस्त्यात धुलाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:56 AM2021-10-19T09:56:43+5:302021-10-19T09:57:44+5:30

बीडमध्ये औरंगाबादची पुनरावृत्ती; तोंड लपवत दोघांनी ठोकली धूम

wife beats husband after caught him red handed with another woman | पतीसोबत कारमध्ये भलतीच बाई... पत्नीने केली भररस्त्यात धुलाई!

पतीसोबत कारमध्ये भलतीच बाई... पत्नीने केली भररस्त्यात धुलाई!

Next

बीड : प्रेयसीला गुपचूप हॉटेलमध्ये घेऊन आलेल्या पतीला कारमध्ये बसताना रंगेहाथ पकडून जाब विचारणाऱ्या पत्नीचा औरंगाबादेतील व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. नेमका असाच प्रसंग सोमवारी रात्री साडेआठ वाजता शहरातील गजबजलेल्या आण्णा भाऊ साठे चौकात घडला. प्रेयसीसोबत कारमधून ज्यूसबारमध्ये आलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. तोंड लपवत दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पत्नीने दोघांची भररस्त्यात धुलाई केली. 

त्याचे झाले असे, शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत राहणारी एक व्यक्ती काळ्या कारमधून प्रेयसीसह आण्णा भाऊ साठे चौकातील ज्यूसबारमध्ये आली होती. पत्नीला पतीवर शंका होतीच. ती आपला भाऊ व सासूसोबत त्याचा पाठलाग करत आली, तेव्हा ते दोघे ज्यूसबारमध्ये आढळले. पत्नीसह सासू व मेहुण्याला पाहून त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने प्रेयसीसह तेथून काढता पाय घेत कारमध्ये जाऊन बसला. मात्र, पत्नीने कारसमोर उभे राहून पतीसह प्रेयसीला गाडीखाली खेचण्याचा प्रयत्न केला. पती पत्नीची समजूत काढत होता, पण ती काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. पतीची गचांडी पकडून तिने संताप व्यक्त केला, तर  प्रेयसीच्या डोक्याचे केस पकडून जाब विचारला.  भररस्त्यात सुरू असलेला   पती-पत्नी व पतीच्या प्रेयसीचा गोंधळ पाहून चौकात बघ्यांची तोबा गर्दी झाली. 

प्रेयसीला घेऊन धूम ठोकणाऱ्या पतीने थेट शिवाजीनगर ठाणे गाठले, तर इकडे पत्नीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटना शहर ठाण्याच्या  हद्दीत झाल्याने शिवाजीनगर पोलिसांनी पतीलाही शहर ठाण्यात जाण्यास सांगितले. या संदर्भात उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.   

विनवणी करत केले पलायन 
प्रेयसीसोबत पाहून चिडलेल्या पत्नीला शांत करण्याचा पतीने खूप प्रयत्न केला. विनवणी केली. मात्र, तिचा पारा चढला होता. त्यामुळे पतीने प्रेयसीसह कसेबसे कारमधून  पलायन केले. यावेळी पत्नीने रागाच्या भरात कारच्या काचा फोडल्या. 

जिममध्ये नवऱ्यासह प्रेयसीची चपलेने धुलाई
भाेपाळ: अनेक जण जिममध्ये फिटनेस आणि आराेग्यासाठी घाम गाळताना दिसतात; मात्र जिममध्ये घाम गाळण्यासाेबतच इतरही कारनामे करायला लागले. बायकाेला याची माहिती मिळाल्यावर ती जिममध्ये धडकली आणि तुफान राडा केला. ही घटना भाेपाळची आहे. नवऱ्याचे जिममध्ये येणाऱ्या एका युवतीसाेबतचे प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर हा राडा झाला आहे. 
जिमच्या आत एक महिला एका पुरुष आणि युवतीला चपलेने मारहाण करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चपलेने मारणारी महिला त्या पुरुषाची पत्नी असून, दुसरी युवती त्याची प्रेयसी आहे. भाेपाळच्या काेहेफिझा परिसरात एक युनिसेक्स जिम आहे. तेथे एक विवाहित पुरुष व्यायामासाठी जात हाेता. तेथेच एक तरुणीही येत हाेती. दाेघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्याच्या बायकाेला प्रेम प्रकरणाची माहिती झाली. तिने रंगे हात दाेघांना पकडण्याची याेजना आखली आणि त्यानंतर जिममध्ये हा सर्व राडा झाला. घरी बायकाे आणि मुलांना साेडून बाहेर चक्कर चालवताे, असा आरडाओरडा करून तिने नवरा आणि त्याच्या प्रेयसीला चांगलेच धुतले.
ट्रिपल तलाकचे प्रकरण : नवऱ्याने दावा केला आहे, की त्याने तिला घटस्फाेट दिला आहे. तर महिलेचे म्हणणे आहे, की त्याने ट्रिपल तलाक दिला असून, न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.

Web Title: wife beats husband after caught him red handed with another woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.