परळीची मान राज्यात उंचावेल, असे काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:00 AM2019-10-13T00:00:45+5:302019-10-13T00:01:39+5:30

माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना घातली.

We will do the work that will raise the neck of the parli in the state | परळीची मान राज्यात उंचावेल, असे काम करू

परळीची मान राज्यात उंचावेल, असे काम करू

googlenewsNext
ठळक मुद्देपंकजा मुंडे। औरंगाबादला स्थायिक झालेल्या परळीकरांशी संवाद; लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा वारसा चालविणार

परळी : आम्ही परळी मतदार संघातील आहोत असे सांगताना तुमची मान अभिमानाने उंचावेल असे काम करीन, परळीच्या विकासाची अनेक स्वप्ने मला साकारायची आहेत, माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना घातली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, परळी हा अतिशय भाग्यवान मतदार संघ आहे. १९८० पासून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी परळीचे नावलौकिक वाढविणारे काम केले. मला आता सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असून, या संधीचे सोने करीत आहे. मी परळी मतदार संघात अनेक योजना राबवून विकासाला गती दिली आहे. तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रीय महामार्ग, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री पेयजल योजना अशा योजनांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणून विकास अगदी वाडी, तांड्यापर्यंत पोहचविला आहे. परळीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात परळी मतदारसंघाचा विकास आणखी गतिमान करणार आहे. त्यासाठी मला पाठबळ देण्यासोबतच तुमचा आशीर्वादही हवा आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विकासकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न हाणून पाडा
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आपल्या जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. तोच वसा आणि वारसा पुढे चालवण्याचे काम मी करीत आहे. त्यात काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु आपल्या प्रेमाच्या ताकदीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडून यशस्वी होईन आणि साहेबांच्या स्वप्नातील विकास मी प्रत्यक्षात करून दाखविन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परळी व परिसरातील भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून औद्योगिक वसाहत उभारणार असून अनेक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी विशेष योजना राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, दिपक ढाकणे, शिवम घुले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: We will do the work that will raise the neck of the parli in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.