मतदारसंघास कुटुंब मानून विकास करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:09 AM2019-10-17T00:09:37+5:302019-10-17T00:10:43+5:30

केज विधानसभा मतदारसंघ हे कुटुंब मानून कुटुंबाप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नमिता अक्षय मुंदडा यांनी केज तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये दिली.

We will develop the constituency as a family | मतदारसंघास कुटुंब मानून विकास करू

मतदारसंघास कुटुंब मानून विकास करू

Next
ठळक मुद्देनमिता मुंदडा यांचे केज मतदारसंघातील आनंदगाव, सारणी, सोनीजवळा येथे प्रतिपादन

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघ हे कुटुंब मानून कुटुंबाप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नमिता अक्षय मुंदडा यांनी केज तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये दिली.
केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा-सेना-महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या बुधवारी केज तालुक्यातील आनंदगाव, सारणी, सोनीजवळा, पैठण, ढाकेफळ आदि गावांमध्ये सभा व बैठका झाल्या. यावेळी मतदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.योगिनी थोरात यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नमिता मुंदडा म्हणाल्या, जनतेचे ठिकठिकाणी मिळणारे मोठे पाठबळ हीच आमच्या मुंदडा कुटुंबियांची खरी शक्ती आहे. कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा कायापालट झाला. अनेक विकासाच्या महत्त्वपूर्ण योजना त्यांनी राबविल्या. अंबाजोगाई व केज शहराला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा योजना केल्या. अंबाजोगाईत कार्यान्वित झालेली सर्व कार्यालये त्यांच्या कार्याची साक्ष देतात. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला. पाझर तलाव व साठवण तलावांचे मोठे जाळे निर्माण केले.
विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावला. मंदिर तिथे सभामंडप, स्मशानभूमी, रस्ते, वीज, पाणी या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. गावांना भरभरून विकासासाठी निधी प्राप्त झाला. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले.
आगामी काळातही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाला कुटुंब मानून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. केज विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात नाव उंचावेल, अशी कामगिरी आपण करून दाखवू, असे नमिता मुंदडा म्हणाल्या.
मतदारसंघाला ‘त्या’ दिशा देतील: थोरात
नमिता मुंदडा या उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. त्यांच्याकडे विकासाची मोठी दृष्टी आहे. विकासाचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची मोठी गंगा आपल्या मतदारसंघात येणार आहे. यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून मतदारसंघाला त्या नवी दिशा देतील. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साध्य होईल. ज्याप्रमाणे विमलताईंच्या नेतृत्वाने मतदार संघाला गती दिली. त्याच धर्तीवर नमिता मुंदडाही मतदार संघाला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवतील व या भागाचा निश्चितच विकास करतील, असे प्रतिपादन डॉ.योगिनी थोरात यांनी केले.

Web Title: We will develop the constituency as a family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.