अण्णांना मत म्हणजे विकासाला मत - गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:20 AM2019-10-18T00:20:22+5:302019-10-18T00:20:51+5:30

अण्णांना मत म्हणजे विकासाला मत म्हणजे आण्णांना मत... हे सूत्र आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये खरे करून दाखवायचे आहे.

Vote for Anna means vote for development - Gadkari | अण्णांना मत म्हणजे विकासाला मत - गडकरी

अण्णांना मत म्हणजे विकासाला मत - गडकरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अण्णांना मत म्हणजे विकासाला मत म्हणजे आण्णांना मत... हे सूत्र आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये खरे करून दाखवायचे आहे. शहराचा आणि मतदारसंघाचा विकास असाच सुरू ठेवण्यासाठी आपल्याला धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून आणायचे आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संपदा गडकरी यांनी केले.
जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शिंदेनगर भागात कॉर्नर बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर, चंद्रकला बांगर, रेखा वाघमारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गडकरी म्हणाल्या, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या एवढा सर्वोत्तम पर्याय दुसरा नसल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, आजवर केलेल्या विकास कामांच्या बळावर आम्ही मतदान मागतो आहोत. अण्णांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिंदेनगर परिसरातील महिला, युवक, शिवसैनिक उपस्थित होते.
विकासात्मक दृष्टी
शहरातील विठ्ठलनगर, धानोरा रोड भागामध्ये कॉर्नर बैठक झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यांनी अण्णांच्या माध्यमातून आजवर झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला. आपल्याला या निवडणुकीत विकास कामे करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे विकासाभिमुख दृष्टी आहे. दर्जेदार रस्ते, नाल्या, पाणी, आरोग्यविषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा, विजेचा नियमित पुरवठा, महिला स्वावलंबनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वाती अलझेंडे, पूनम कांबळे, रमाबाई ओहाळ, विमल वडमारे, सत्यभामा ओहाळ, मंदा कांबळे, मीरा थोरात, लक्ष्मी वारभवन, रीना लोखंडे, अनिता कुचेकर, वैशाली खरात उपस्थित होत्या.
धोंडीपुरा भागात पदयात्रा
बीड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा, रिपाइं, शिवसंग्राम, रासप, रयत क्र ांतीचे अधिकृत उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेतून काळे गल्ली, थिगले गल्ली, बोबडेश्वर गल्ली, धोंडीपुरा, पाटांगणकर गल्ली, सराफ रोड, कोतवाल गल्ली, टिळक रोड, जवेरी गल्ली, कबाड गल्ली, पिंगळे गल्ली, बलभीम चौक या भागात प्रत्यक्ष दारोदार जाऊन मतदारांना भेटून जयदत्तअण्णा क्षीरसागर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष दीपा क्षीरसागर यांनी केले. नगरसेवक किशोर काळे, अंजली काळे, राजेंद्र काळे तसेच महिला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्या या रॅलीमध्ये सहभागी होत्या.

Web Title: Vote for Anna means vote for development - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.