वर्णी महापूजेने श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:03 AM2019-12-04T00:03:20+5:302019-12-04T00:05:20+5:30

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३ ते ११ डिसेंबर ...

Varni Mahapuja started Shree Yogeshwari Devi Margashi festival | वर्णी महापूजेने श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव सुरू

वर्णी महापूजेने श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देआराध बसण्यासाठी महिलांची गर्दी : सुविधांसाठी देवल समितीच्या वतीने उपाययोजना

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. मंगळवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली.
मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला आराध बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली.
मंगळवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहरवासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. या वेळी झालेल्या महापूजेला तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर यांनी विधीवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवीचे विश्वस्त कमलाकर चौसाळकर, माजी आ. पृथ्वीराज साठे, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा.अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांच्यासह देवीचे पुरोहित, मानकरी व भक्त उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.
महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची, पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर यांनी दिली.

Web Title: Varni Mahapuja started Shree Yogeshwari Devi Margashi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.