महिन्यापासून जिल्हाधिकारी पद रिक्त; कामकाज रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:11 AM2020-01-06T01:11:46+5:302020-01-06T01:12:15+5:30

एका महिन्यापासून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून कामकाज बघत आहेत.

Vacant post of Collector for months; Work done | महिन्यापासून जिल्हाधिकारी पद रिक्त; कामकाज रखडले

महिन्यापासून जिल्हाधिकारी पद रिक्त; कामकाज रखडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील महिन्यात ४ डिसेंबर २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद येथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती झाली होती. मात्र, त्या रूजू न झाल्यामुळे एका महिन्यापासून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून कामकाज बघत आहेत. परंतु, या ज्या गतिने कामे व्हायला पाहिजेत ती होताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे जिल्हापरिषदेच्या कामकाजावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील प्रशासनात येण्यासाठी नेहमीच अधिकारी वर्गाची नकार असतो. मात्र, मगील महिन्यात जिल्हाधिकारी पदावरून पाण्डेय यांची बदली झाली, त्याठिकाणी प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, त्या बीड येथील जिल्हाधिकारी पदावर रूजू होण्यास इच्छूक होत्या. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे त्या रूजू होऊ शकल्या नाहीत अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना काही राजकीय नेत्यांचा विरोध होता असे देखील बोलले जात आहे.
मात्र, एका महिन्यापासून जिल्हाधिकारी पदावर जि.प.सीईओ अजित कुंभार हे काम पाहत आहेत. त्यांच्याकडे जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही पदभार असल्यामुळे कमकाजावर दोन्ही कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. अनेक कामांना मान्यता देणे, महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे असताना प्रभारी जिल्हाधिकारी हे निर्णय घेत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अनेक योजनांची देयके रखडली आहेत, तसेच अनुदानासाठी ०.२५ टक्के निधी खर्चाचा तहसील स्तरावर देणे गरजेचे असताना ते अनुदान देखील अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही.
दरम्यान, उन्हाळ््यात टँकर व चारा छावणी, निवडणूक कामकाजातील देयके देण्यासाठी मंजुरी देणे आवश्यक आहे. मात्र, त्याला देखील मान्यता देण्यात आलेली नाही. तर, नवीन जिल्हाधिकारी आल्यावर हा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून दिली जाते असे देखील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शासनाने तात्काळ नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक बीड येथे करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
जि.प.मधील योजनांच्या गुत्तेदारांनी कामे ठेवली बंद
जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजना, देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. याची देयके मागील दोन ते अडीच महिन्यापासून रखडली आहेत.
या कामाच्या फाईल सीईओ अजित कुंभार यांच्या स्तरावर प्रलंबित आहेत. यासह इतर विभागील कामकाज देखील स्वक्षरीमुळे रखडल्याचे गुत्तेदारांकडून सांगण्यात आले तर, पाणीपुरवठा विभागाचे काम करणाºया कंत्राटदारांनी निधी मिळेपर्यंत कामं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Web Title: Vacant post of Collector for months; Work done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.