बीड जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस; नित्रुड मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 01:41 PM2020-06-03T13:41:54+5:302020-06-03T13:42:28+5:30

सर्वात कमी शिरूर तालुक्यात पावसाची नोंद

Unseasonal rains throughout Beed district; Overcast in Nitrud Mandal | बीड जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस; नित्रुड मंडळात अतिवृष्टी

बीड जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस; नित्रुड मंडळात अतिवृष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसात नित्रुड मंडळात 102 मिमी पाऊस

माजलगाव :  बीड जिल्ह्यात माजलगाव  तालुक्यातील नित्रुड मंडळात मंगळवारी  अवकाळी पाउस झाला असुन या ठिकाणी 83 मी.मी  पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. माजलगाव तालुक्यात दोन दिवसात 70 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसात मान्सून पूर्व पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. माजलगाव तालुक्यातील नित्रुड महसुली मंडळात मंगळवारी अतिवृष्टी झाली असुन या ठिकाणी 83 मी.मी.पावसाची नोंद झाली होती.दोन दिवसात या ठिकाणी 102 मी.मी.ची नोंद झाली . मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्यात झाला असुन या ठिकाणी आतापर्यंत 69.8 मी.मी.पावसाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वडवणी तालुक्यात 64 मी.मी.ची तर सर्वात कमी शिरूर तालुक्यात पावसाची नोंद झाली असुन या ठिकाणी केवळ 11.3 मी.मी.ची नोंद झाली होती.

Web Title: Unseasonal rains throughout Beed district; Overcast in Nitrud Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.