‘रापम’तील अन्यायग्रस्त लिपिक दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:55 PM2019-09-02T23:55:37+5:302019-09-02T23:57:08+5:30

राज्य परिवहन महामंडळातील लिपिकेस सहकारी अधिकाऱ्यानेच विविध धमक्या देऊन अश्लिल शेरेबाजी केली होती. यावर तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली.

Under unjust clerical panic in 'Rapam' | ‘रापम’तील अन्यायग्रस्त लिपिक दहशतीखाली

‘रापम’तील अन्यायग्रस्त लिपिक दहशतीखाली

googlenewsNext
ठळक मुद्देएसपींकडे धाव : लेखी तक्रार; चौकशी समितीच्या अहवालानंतरही निकाल रखडला

बीड : राज्य परिवहन महामंडळातील लिपिकेस सहकारी अधिकाऱ्यानेच विविध धमक्या देऊन अश्लिल शेरेबाजी केली होती. यावर तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. दोषारोपपत्र तयार करून दाखलही केली. मात्र, यावर निर्णय देण्यास दिरंगाई केली जात असल्याचे समोर आले आहे. तर दुसºया बाजूला अन्यायग्रस्त महिलेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत याबाबत लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाने रापमचे अधिकारी पुन्हा वादाच्या भोवºयात सापडले आहेत.
राज्य परिवहन महामंडळ सध्या चांगलेच वादाच्या भोवºयात सापडले आहे. प्रवाशांना सुरळीत सुविधा तर नाहीच शिवाय अवैध प्रवासी वाहतूकदारांवरील कारवाईकडे दुर्लक्ष करून त्यांना एकप्रकारे पाठबळ दिले जात असल्याचे समोर आले आहे. अशातच कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा वरिष्ठांकडून कारवाईची भिती दाखवित छळ केला जात आहे. याबाबत एका कर्मचाºयाने ३ एप्रिल २०१९ रोजी तक्रारही केली होती. संबंधित अधिकारी हा एका संघटनेचा पदाधिकारी आहे.
मंत्री, वरिष्ठ अधिकाºयांसोबत आपले खुप जमत असल्याचा आव आणून समितीवर दबाव आणला. त्यामुळे समितीने चौकशीला तब्बल पाच महिने वेळ घेतला. अखेर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. याला आठवडा उलटला असला तरी यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त महिला दहशतीखाली असून, तिने सोमवारी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे.

Web Title: Under unjust clerical panic in 'Rapam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.