विजेच्या मागणीत घट; परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:32 PM2020-04-02T12:32:44+5:302020-04-02T12:34:55+5:30

दगडी कोळशाची आवक सुरूच आहे

Three sets of new thermal power plants in Parli closed due to a decrease in electricity demand | विजेच्या मागणीत घट; परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद

विजेच्या मागणीत घट; परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद

Next

- संजय खाकरे
परळी : राज्यातील विजेच्या मागणीत घट झाल्याने येथील नवीन परळी औष्णिक  विद्युत केंद्रातील  तिन्ही  संच  8 दिवसा पासून  बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे 750 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झालेली आहे. मात्र नवीन परळी  विद्युत केंन्द्रात वीज निर्मितीसाठी  लागणाऱ्या  दगडी कोळशाची  आवक चालूच  आहे . चंद्रपूरच्या कोळसा खाणीतुन नांदेड  मार्गे रेल्वे मालगाडी ने परळीत येत आहे. बुधवारी ही रेल्वे रॅक ने कोळसा आल्याचे समजते .                               

परळी तालुक्यातील दाऊतपुर येथे नवीन औष्णिक विद्युत केंन्द्रा मध्ये 250 मेगावॅट क्षमतेचे  प्रत्येकी तीन संच आहेत. संच क्रमांक सहा  हा 21 मार्च रोजी संच क्रमांक सात हा 22 मार्च रोजी  आणि संच 8 हा  23 मार्च रोजी बंद ठेवण्यात आला आहे. राज्यात विजेची  जास्त मागणी नसल्याने हे संच बंद ठेवण्याचे  आदेश महाजनकोच्या मुंबईतील  मुख्य कार्यालयातून देण्यात आलेले आहेत . जेव्हा राज्यात विजेची मागणी वाढली तेव्हाच हे संच सुरू करण्यात येथील  असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.      

येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी लागणाऱ्या दगडी कोळशाची वाहतूक नांदेड व्हाया परळीला होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे खाणीतून दगडी कोळश्याची नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात  आवक चालू आहे,परळी चे नवीन वीज निमिर्ती केंद्र आठ दिवसा पासून बंद असले तरी कोळश्याची साठवणूक केली जात आहे, त्यामुळे रेल्वेने कोळसा येत असल्याची माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्यअभियंता नवनाथ शिंदे यांनी दिली.

Web Title: Three sets of new thermal power plants in Parli closed due to a decrease in electricity demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.