तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:04 AM2020-01-12T00:04:56+5:302020-01-12T00:05:27+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे.

Three 'red fairy' accidents in three years | तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

तीन वर्षांत ‘लाल परी’चे २०३ अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवास ठरतोय धोक्याचा। ३४ अपघातांमध्ये प्राणहानी; एसटीचा प्रवास सुरक्षित करण्याची गरज

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर आणि आरामदायी मानला जातो. मात्र, मागील तीन वर्षांतील माहिती घेतली असता बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाले आहेत. पैकी ३४ अपघातांत प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. २१६ अपघात हे गंभीर स्वरूपाचे आहेत. या आकडेवारीवरून ‘लाल परी’चा प्रवास धोक्याचा ठरत असल्याचे समोर आले आहे.
‘बसचा प्रवास, सुखकर प्रवास’ समजला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळांच्या बस गाड्यांच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच केज तालुक्यात जीप व बसचा अपघात झाला होता. यात तब्बल तीन प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. हाच धागा पकडून माहिती घेतली असता मागील तीन वर्षांत बीड जिल्ह्यात तब्बल २०३ अपघात झाल्याचे समोर आले आहे. ३९ अपघात किरकोळ असल्याची नोंद असून ३४ अपघातांत प्रवाशांचा जीव गेला आहे. गतवर्षांत तब्बल १०० अपघात झाले आहेत. अपघातांत किती जखमी झाले, किती मयत झाले आणि किती प्रवाशांना मदत केली, याची माहिती मात्र, रापमकडून वेळेअभावी मिळू शकली नाही.
रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाच
अपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात सामान्यांना माहिती देण्यासह चालकांनाही मार्गदर्शन केले जाते. मात्र, या सप्ताहात चालकांना परिपूर्ण माहिती दिली जात नाही. तसेच वर्षभरातही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी होत नसल्याने अपघात होत असल्याचे एका चालकाने सांगितले.

Web Title: Three 'red fairy' accidents in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.