Take possession of the train engine | रेल्वे इंजिनचा प्रवाशाने घेतला ताबा
रेल्वे इंजिनचा प्रवाशाने घेतला ताबा

परळी : रेल्वे स्थानकात थांबलेल्या परळी-अकोला रेल्वे प्रवासी गाडीचा ताबा एका प्रवाशाने घेतल्यामुळे मंगळवारी दुपारी काही वेळ गोंधळ उडाला. सजग प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले.

परळी रेल्वे स्थानकावर परळी-अकोला गाडी आल्यानंतर ती निघण्याच्या वेळेत एका प्रवाशाने लोको पायलटच्या जागी ठाण मांडले. हा प्रकार काही प्रवासी, लोको पायलट (इंजिन चालक) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच सावधगिरी बाळगत त्याला खाली उतरण्यास सांगण्यात आले. परंतु तो प्रतिसाद देत नव्हता.

अखेर प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाºयांनी इंजिनमधून त्याला बळजबरीने बाहेर काढले. नंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत.

 


Web Title: Take possession of the train engine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.