कृष्णा खोऱ्यातील पाणी ‘मांजरा’त आणण्यासाठी सर्वेक्षण होणार -संगीता ठोंबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:41 PM2018-12-02T23:41:03+5:302018-12-02T23:42:13+5:30

कृष्णा खोºयातील मराठवाड्याला मिळणाºया २१ पैकी ५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मांजरा धरणात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात " १५ कोटी अधिवेशनात मंजूर केल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी दिली.

Survey will be done to bring 'water from Krishna valley' to Manjra - Sangeeta Thombre | कृष्णा खोऱ्यातील पाणी ‘मांजरा’त आणण्यासाठी सर्वेक्षण होणार -संगीता ठोंबरे

कृष्णा खोऱ्यातील पाणी ‘मांजरा’त आणण्यासाठी सर्वेक्षण होणार -संगीता ठोंबरे

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : कृष्णा खोºयातील मराठवाड्याला मिळणाºया २१ पैकी ५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मांजरा धरणात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात " १५ कोटी अधिवेशनात मंजूर केल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत आ. ठोंबरे म्हणाल्या, केज विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
मांजरा धरणात कृष्णा खोºयातील ५ टीएमसी पाणी आणण्यासाठीच्या सर्वेक्षणासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील केजडी नदीवरील पूल बांधकामासाठी ७१ लाख रुपये, तर सांस्कृतिक भवनासाठी आणखी दोन लाख रुपये मंजूर झाले आहेत. तालुक्यात चिंचोली माळी व कुंबेफळ येथे सौर ऊर्जेचे दोन प्रकल्प मंजूर झाले असून, परिसरातील आठ-दहा गावांना २४ तास वीज मिळणार आहे.
गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी हारूण इनामदार, सुनील गलांडे, पंजाब देशमुख, सुहास गुजर, अनिल पाखरे यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
५ टीएमसी पाण्यासाठी केले होते आंदोलन
मराठवाड्याला मंजूर असलेल्या कृष्णा खोºयातील पाण्यापैकी ५ टीएमसी पाणी मांजरा धरणात सोडावे, या मागणीसाठी आ. संगीता ठोंबरे यांनी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान आंदोलन केले होते. पहिल्या टप्प्यात नदीजोड प्रकल्पांतर्गत १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने मांजरा धरणात ५ टीएमसी पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Survey will be done to bring 'water from Krishna valley' to Manjra - Sangeeta Thombre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.