मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:37 AM2019-09-16T11:37:59+5:302019-09-16T11:40:05+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रांवर गुन्हा दाखल 

Suicide of a youth dou to abusing and beatings | मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देमित्रांनी केली होती काठीने मारहाण

कडा (जि. बीड) : मित्रांनी मारहाण केल्यामुळे झालेला अपमान सहन न झाल्याने आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी आकाश दत्तू शिंदे (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अंभोरा येथील रहिवासी राम महादेव बोकडे (५९), शंकर बापू ओव्हाळ (३३) आणि आकाश दत्तू शिंदे (२२) हे तिघेही बीड - नगर रोडवरील एका कंपनीत काम करीत होते. शुक्रवारी तिघेही दुपारी बाहेर आले आणि  बरडदरी परिसरात येऊन आकाश शिंदे याला राम व शंकर यांनी काठीने मारहाण केली. या मारहाणीत अपमान झाल्याने  आकाश  याने शुक्रवारी दुपारी तीन ते शनिवारी सकाळी नऊ दरम्यान अंभोरा येथील नदीच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी आकाश शिंदे यांचे वडील दत्तू अंबादास शिंदे यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शंकर बापू ओव्हाळ यास अटक केली असून राम महादेव बोकडे हा फरार आहे. सपोनि. ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide of a youth dou to abusing and beatings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.