कडक लॉकडाऊन वाढवला, सूट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:12+5:302021-05-08T04:36:12+5:30

बीड : १५ मे पर्यंत राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. दरम्यान बीडमधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, ...

Strict lockdown extended, discount canceled | कडक लॉकडाऊन वाढवला, सूट रद्द

कडक लॉकडाऊन वाढवला, सूट रद्द

Next

बीड : १५ मे पर्यंत राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. दरम्यान बीडमधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. दरम्यान, ८ व ९ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदासाठी सूट देण्यात आली होती. मात्र, ती सूट रद्द करण्यात आली असून, ७ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे १२ मे पर्यंत फक्त आरोग्य विषय आस्थापना दिवसभर सुरु राहणार आहेत. इतर सर्व बंद ठे‌वण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ८ व ९ रोजी खरेदीसाठी देण्यात आलेली सूट प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे १२ मे पर्यंत दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप, गॅस पुरवठा दिवसभर सुरु राहणार आहे. तर, सकाळी ७ ते १० दूध व भाजी व फळ विक्री करता येणार आहे. फक्त फळांची विक्री सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत करता येईल. तर, बँका सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान परवानगी व्यतिरिक्त उघडलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक

प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागाचे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, पत्रकार यांच्याकडे प्रवासादरम्यान ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

तर दुकाने सील

८ ते १२ मे या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Strict lockdown extended, discount canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.