भरधाव दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक; दोन ठार,एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 06:03 PM2020-06-02T18:03:55+5:302020-06-02T18:04:28+5:30

हा अपघात गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ झाला

speedy two-wheeler hits a tractor; Two killed, one injured | भरधाव दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक; दोन ठार,एक जखमी

भरधाव दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक; दोन ठार,एक जखमी

Next

गेवराई : भरधाव दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण ठार तर एकजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि.1 ) रात्री दहाच्या सुमारास तालुक्यातील कोळगावजवळ झाला.

तालुक्यातील पोखरी येथील जनार्धन मोघे, भारत मोघे व बाळासाहेब मोघे हे तिघे जण दुचाकीवरून ( क्रमांक एम.एच २३ के.९३६८) कोळगावहून पोखरीकडे येत होते. रात्री दहाच्या सुमारास कोळगावजवळ आले असता त्यांची दुचाकी समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला (क्रमांक एम.एच.२३ बी ७३१०) पाठीमागून धडकली. धडक जोरदार असल्याने तिघेही रस्त्यावर कोसळले. गंभीर अवस्थेत तिघांना उपचारासाठी बीडला रवाना करण्यात आले. दरम्यान, जनार्धन मोघे व भारत मोघे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.  तर बाळासाहेब मोघे यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: speedy two-wheeler hits a tractor; Two killed, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.