नगराध्यक्ष चाऊसवर दुसऱ्या गुन्ह्याची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:52 PM2020-03-06T22:52:00+5:302020-03-06T22:53:24+5:30

अपहारप्रकरणी दाखल अन्य गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगराध्यक्षांवर टांगती तलवार आहे.

The second hanging sword on the city president's chase | नगराध्यक्ष चाऊसवर दुसऱ्या गुन्ह्याची टांगती तलवार

नगराध्यक्ष चाऊसवर दुसऱ्या गुन्ह्याची टांगती तलवार

Next
ठळक मुद्देलेखापालाची कोठडी वाढली, दोघांना अंतरिम जामीन : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपास

बीड / माजलगाव : येथील नगर परिषदेत अपहार प्रकरणी अटकेत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस व मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांची येथील न्यायालयाने अंतरिम जामिनावर सुटका केली तर लेखापाल अशोक कुलकर्णी यांची दुस-या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी कायम ठेवली आहे. मात्र अपहारप्रकरणी दाखल अन्य गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगराध्यक्षांवर टांगती तलवार आहे.
येथील नगर परिषदेत १ कोटी ४४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी तीन मुख्याधिकारी व इतर चार कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात नगराध्यक्ष चाऊस यांना बुधवारी नगर परिषद कार्यालयात पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी (वांगीकर) हे दोघे स्वत: पोलिसांकडे हजर झाले होते.
या तिघांनाही येथील न्यायालयाने ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे तिघांचीही बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा विभागात कसून चौकशी करण्यात आली. दोन दिवसाच्या चौकशीनंतर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहाल चाऊस, मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना न्यायालयासमोर उभे केले. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.ए वाघमारे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर चाऊस व येलगट्टे यांची ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात येऊन सुटका करण्यात आली.
त्यांना पुन्हा ११ मार्च रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. तर लेखापाल अशोक कुलकर्णी यांना दुसºया गुन्ह्यात कायम ठेवून पोलीस कोठडी कायम राहिली आहे.
योजनेचे पैसे वळवले : दुसरा गुन्हा दाखल
माजलगाव नगरपालिकेत झालेल्या तक्रारी या २०१२ ते २०१६ या कालवधीमध्ये झालेल्या कामाबद्दल आहेत. दरम्यान या कामाची देयके सहाल चाऊस यांच्याकडे पदभार आल्यानंतर तीन मुख्याधिका-यांच्या कार्यकाळात देण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दुसरा गुन्हा हा योजनेचा निधी लेखाअधिकारी कुलकर्णी यांनी इतर योजनेत वळता केल्याचा देखील दाखल आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना जामिन नाकारून पोलीस कोठडी कायम ठेवली आहे. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची नावे येण्याची शक्यता आहे.

Web Title: The second hanging sword on the city president's chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.