रुईकर कुटुंबीयांचं पालकत्व स्विकारलं, मंत्री एकनाथ शिंदेंनी आर्थिक मदतही दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:44 PM2021-12-28T22:44:30+5:302021-12-28T22:55:06+5:30

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

Ruikar accepted the guardianship of the family, Minister Eknath Shinde also provided financial assistance | रुईकर कुटुंबीयांचं पालकत्व स्विकारलं, मंत्री एकनाथ शिंदेंनी आर्थिक मदतही दिली

रुईकर कुटुंबीयांचं पालकत्व स्विकारलं, मंत्री एकनाथ शिंदेंनी आर्थिक मदतही दिली

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 5 लाख रुपयांची रोख मदत केल्यानंतर आज शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही 5 लाख रुपयांची तात्पुरती मदत पोहच केली

मुंबई/बीड - राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील एका कट्टर शिवसैनिकाने तिरुपती बालाजीपर्यंत पदयात्रा काढली होती. पण, या पदयात्रेदरम्यान त्या शिवसैनिकाचे निधन झाले आहे. या शिवसैनिकाच्या घरी जाऊन शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांत्वन करत पीडित कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही केली. त्यानंतर, आता मंत्री एकनाथ शिंदे यांनीही 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.  

उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी सुमंत रुईकर (Sumant Ruikar) व त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीकडे पायी निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने रुईकर यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या बीड शहरात हळहळ व्यक्त केली. तर, राज्यभरातील शिवसैनिकांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. 

तिरूपतीला जाताना मृत्युमुखी पडलेल्या सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरू आहे. सोमवारी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 5 लाख रुपयांची रोख मदत केल्यानंतर आज शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही 5 लाख रुपयांची तात्पुरती मदत पोहच केली. तसेच, या पीडित कुटुंबीयांचं पालकत्व ठाणे जिल्हा शिवसेनेच्यावतीने स्विकारण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. 


दरम्यान, पुढील आठवडाभरात एकनाथ शिंदे हे रूईकर कुटुंबियांना भेटण्यासाठी बीडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहितीही संबंधित शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली. यावेळी, एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबींशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.  

तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. 1 डिसेंबरला ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावे यासाठी रुईकर चालत जात होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपतीला पोहचण्याचा संकल्प होता. पण, ताप आल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वीही केली होती पायी यात्रा
सुमंत रुईकरांच्या मृत्युने बीड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमंत रूईकर यांनी यापूर्वी 2019 मध्ये उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती पायी यात्रा केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांचा कौतुक करत सत्कार केला होता.
 

Web Title: Ruikar accepted the guardianship of the family, Minister Eknath Shinde also provided financial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.