बनावट कागदपञाद्वारे शासनाची ९४ लाखाची फसवणुक; संजय रुद्रवार विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:17 PM2020-03-13T18:17:27+5:302020-03-13T18:17:55+5:30

याबाबत निघालेल्या घोळानंतर उपविभागिय अधिकारी माजलगाव यांनी सजय मधुकर रुद्रवार यास रक्कमेची मागणी केली.

Rs. 94 lakh fraud by the government through fake documents; a complaint filed against Sanjay Rudravar | बनावट कागदपञाद्वारे शासनाची ९४ लाखाची फसवणुक; संजय रुद्रवार विरोधात गुन्हा दाखल

बनावट कागदपञाद्वारे शासनाची ९४ लाखाची फसवणुक; संजय रुद्रवार विरोधात गुन्हा दाखल

Next

माजलगाव : माजलगाव शहरातून गेलेला कल्याण - विशाखापट्टनम या राष्ट्रीय महामार्ग २२२ साठी संपादित करण्यात आलेली जमिन स्वतःची असल्याचे बनावट कागदपञे शासनाला सादर करुन तब्बल ३ कोटी ४५लाख ५२ हजार १७० रुपये उचलले. माञ यातील ९४ लाख रुपये हे दुसऱ्याच्या जमिनीचे असल्याचे पुढे आल्याने व्यापारी संजय मधुकर रुद्रवार याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण -विशाखापट्टनम्  राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ च्या रुंदीकरणासाठी माजलगाव शहरातील गट न.२२८,३३७ मधील काही जमिनीची शासनाने भुसंपदनाची कारवाई केली.  यावेळी संजय मधुकर रुद्रवार यांने उपविभागिय अधिकारी माजलगाव यांच्याकडे खोटे व बनावट कागदपञे सादर करून ३कोटी ४५लाख ५२ हजार १७० रुपये उचलले होते. माञ, याच संपादित जमिनीत येथील दुसरे व्यापारी सत्यप्रकाश सत्यप्रेम रुद्रवार यांची ही जमिन संपादित झाली होती. त्यांना या मधील एक रूपयांचा मावेजा न मिळाल्याने सत्यप्रकाश रुद्रवार यांनी शासनाकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुशंगाने महामार्ग विभाग औरंगाबाद व भुमिअभिलेख कार्यालय माजलगाव यांच्या संयुक्त  मोजणीत तक्रारदार सत्यप्रकाश रुद्रवार यांची ६०२.५ चौ.मी जमिन आढळुन आली. त्या संपादित जमिनीचा मावेजा २०१९ रोजी ७७ लाख रुपये होता. 

याबाबत निघालेल्या घोळानंतर उपविभागिय अधिकारी माजलगाव यांनी सजय मधुकर रुद्रवार यास रक्कमेची मागणी केली. अनेक वेळा नोटिस दिल्या तरीही रक्कम परत न दिल्याने संजय रुद्रवार यांने शासनाची फसवणुक केली असल्याचे सिध्द झाले. यावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार अविनाश वैजेनाथ निळेकर  यांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी संजय मधुकर रुद्रवार याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन शासनाची फसवणुकच्या कलमासह भुसंपादन अधिनियमनाच्या कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.

Web Title: Rs. 94 lakh fraud by the government through fake documents; a complaint filed against Sanjay Rudravar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.