Restrictions on uterus removal for a woman within 35 years | ३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध
३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध

ठळक मुद्देघ्यावी लागेल परवानगीनवी मार्गदर्शक तत्त्वे

बीड : जिल्ह्यामधील हजारो ऊसतोडणी महिला कामगारांची गर्भाशये काढल्याचे उघडकीस आल्याने खडबडून जाग आलेल्या सरकारने गर्भाशय शस्त्रक्रियेसंदर्भात १७ मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार ३५ वर्षांखालील महिलेची गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्यास त्याचे मेडिकल आॅडिट केले जाईल आणि दर महिन्याला अशा शस्त्रक्रियांचा अहवाल शल्यचिकित्सकांना सादर करावा लागेल. याची राज्यभरात अंमलबजावणी होणार आहेत. 

अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करून पाठविली आहेत.  बीड जिल्ह्यात महिलांची गर्भाशये काढण्याचा प्रकार समोर येताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समितीने चौकशी केली होती.  आता कडक पावले उचलत ३५ वर्षांच्या आत शस्त्रक्रिया केल्यास मेडिकल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयाला गर्भाशये काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. ती  माहिती दर महिन्याला जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर करावी लागेल. यापुढे ऊसतोडणी महिलांची जाण्यापूर्वी व परतल्यानंतर आरोग्य तपासणी करण्यात येणार  आणि आरोग्य तपासणीचे स्वतंत्र रजिस्टर ठेवले जाईल. 

गर्भाशय शस्त्रक्रियेसंदर्भात पत्र आले आहे. याची सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल. तसे आदेश सर्वच तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी दिले जातील. - डॉ. राधाकृष्ण पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड


Web Title: Restrictions on uterus removal for a woman within 35 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.