अंबाजोगाईत पत्त्याच्या क्लबवर छापा; २७ जुगारी ताब्यात, साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 03:18 PM2021-01-21T15:18:49+5:302021-01-21T15:33:24+5:30

Raid on gambling club in Ambajogai पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते.

Raid on gambling club in Ambajogai; 27 gamblers arrested, Rs 18.5 lakh seized | अंबाजोगाईत पत्त्याच्या क्लबवर छापा; २७ जुगारी ताब्यात, साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाईत पत्त्याच्या क्लबवर छापा; २७ जुगारी ताब्यात, साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाजोगाई साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात पथकाची कारवाई काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार खेळणारे अटकेत

अंबाजोगाई : गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक आ. राजा यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.२०) अंबाजोगाई येथे दाखल होत कारखाना रोडवरील एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी झन्ना-मन्ना जुगार खेळणाऱ्या २७ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोठ्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

बुधवारी पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते. यावेळी अंबाजोगाई साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरिक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी रात्री ९.३० वाजता पथकातील कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी तीन गटात २७ व्यक्ती जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७ लाख ५७ हजार दोनशे रुपयांच्या रोख रकमेसह ११ दुचाकी, १ चारचाकी, मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विलास हजारे, पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलमवाड, तौर यांनी पार पाडली. एवढ्या मोठ्या संख्येने जुगारी पकडले गेल्याने शहरात खळबळ उडाली असून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

यांच्यावर झाली कारवाई :
याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंद साखरे, विशाल पंडितराव चाटे, सय्यद सुलतान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहीद बेग खालील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वंभर काळे, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, ज्ञानेश्वर उर्फ माऊली पतंगे, नितीन कैलास साठे, राहुल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देविदास काशिनाथ चौगुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरवनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धरामअप्पा पोखरकर (सर्व रा. अंबाजोगाई), भगवान विठोबा वैद्य, नितेश मधुकर वैद्य, अहमद इब्राहीम बागवान (रा. घाटनांदूर),  नासेरखान शेरखान, निलेश अशोक फड (रा. परळी) आणि राम बली निसार (रा. अलाहबाद, उत्तर प्रदेश) या २७ जुगाऱ्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Raid on gambling club in Ambajogai; 27 gamblers arrested, Rs 18.5 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.