Print at the Greatest Gambling Base | महासांगवीत जुगार अड्ड्यावर छापा
महासांगवीत जुगार अड्ड्यावर छापा

कडा : पोळा सणादिवशी तिर्रट नावाचा जुगार महासांगवीत (ता. पाटोदा) सुरु असल्याच्या गुप्त माहितीवरुन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा मारला. यावेळी नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले असून, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महासांगवी येथे शुक्रवारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना सय्यद साजेद शब्बीर (रा. इस्लामपुरा,पाटोदा), मोहमंद यासीन कुरेशी (रा. पाटोदा) ,जमीर बसीर शेख (रा. आष्टी), राजेंद्र लहानबा सानप (रा. पाटोदा), राम बाबू बांगर (रा. भायाळा), दादाराव हरिभाऊ बांगर (रा. भायाळा), भरत केशव कांबळे (रा. महासांगवी), रावसाहेब तुकाराम धोंडे (रा.आष्टी), शेख असलम अली आतार (रा. आष्टी) यांना ताब्यात घेतले. नगदी ३८ हजार ६४५, मोबाईल १७ हजार रुपये, कार, २ मोटारसायकल किंमत ३ लाख ५ हजार असा एकूण ३ लाख ५९ हजार ६४५ रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. पाटोदा ठाण्यात पो.ना. विकास विठ्ठलराव राठोड यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.
उप अधीक्षक विजय लगारे, पो.ना. विकास राठोड, अमोल ढवळे, पो.शि. उध्दव गडकर, राम आगरकर, अंमळनेर ठाण्यातील आघाव, पवळ, भालसिंग चालक, पोलीस नाईक दादासाहेब उदावंत, विठ्ठल वारे यांनी केली आहे.


Web Title: Print at the Greatest Gambling Base
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.