भाविकांना सुखद धक्का ! नव्या साप्ताहिक रेल्वेने कोल्हापूर- पंढरपूर- परळी- नांदेड - गया तीर्थक्षेत्र गेली जोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 07:07 PM2021-02-13T19:07:04+5:302021-02-13T19:09:18+5:30

New weekly train from Kolhapur to Dhanbad कोल्हापूर - धनबाद कोल्हापूर ही रेल्वे विशेष गाडी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता कोल्हापूर येथून सुटणार आहे.

Pleasant shock to devotees! New weekly train connects Kolhapur-Pandharpur-Parli-Gaya pilgrimage site | भाविकांना सुखद धक्का ! नव्या साप्ताहिक रेल्वेने कोल्हापूर- पंढरपूर- परळी- नांदेड - गया तीर्थक्षेत्र गेली जोडली

भाविकांना सुखद धक्का ! नव्या साप्ताहिक रेल्वेने कोल्हापूर- पंढरपूर- परळी- नांदेड - गया तीर्थक्षेत्र गेली जोडली

googlenewsNext

- संजय खाकरे 

परळी : कोल्हापूर -धनबाद- कोल्हापूर उत्तर भारतात  जाणारी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून 19 फेब्रुवारी पासून धावणार आहे. परळी  वैजनाथ रेल्वे स्टेशन मार्गे ही रेल्वे धावणार असल्याने येथील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.  लांब पल्ल्याची गाडी सुरू होत असल्याने बीड जिल्ह्यातील प्रवासी व भाविकां चा पैश्याचा अपव्यय  टळेल व वेळ बचत होईल. तसेच  देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी उत्तर भारत व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची सोय होईल.  

कोल्हापूर - धनबाद कोल्हापूर ही रेल्वे विशेष गाडी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता कोल्हापूर येथून निघून दुपारी 4.40 वाजता परळी रेल्वे स्टेशनवर येणार आहे . दर शुक्रवारी ही रेल्वे कोल्हापूर, मिरज, कुर्डूवाडी, पंढरपूर,लातूरमार्गे परळीला येणार आहे. नंतर परळीहून परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूरमार्गे इटारसी, गया, जबलपुर ,पारसनाथ मार्गे धनबाद ( झारखंड ) येथे पोहोचेल. यानंतर तिथून निघून याच मार्गे पुन्हा कोल्हापूरला परतेल. 

या साप्ताहिक कोल्हापूर- धनबाद-कोल्हापूर या आठवडी रेल्वे गाडीमुळे भाविक व रेल्वे प्रवाशांची सोय होईल ही रेल्वे सुरू केल्याबद्दल आभार.
- सूर्यकांत ताटे, रेल्वे प्रवासी, परळी   

कोल्हापूर - धनबाद-कोल्हापूर    ही रेल्वे सुरू  करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह  आहे.त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होईल व या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात 
- जी. एस. सौंदळे, समुपदेशक, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष. 

काशी, गया, पारसनाथ येथे जाणे भाविकांना सोपे होईल. शिवाय पंढरपूर, शेगाव, बार्शी येथेही भाविकांना जाणे सोईचे होईल. तसेच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी उत्तर भारत व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची सोय होईल.
- महावीर संघई, परळी

Web Title: Pleasant shock to devotees! New weekly train connects Kolhapur-Pandharpur-Parli-Gaya pilgrimage site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.