गायवाटपातून महिला स्वावलंबी होणार-पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:14 AM2019-09-09T00:14:04+5:302019-09-09T00:14:37+5:30

नीर (पाणी) आणि नारीचा सन्मान होणे गरजेचे आहे. नारी सुरक्षित राहिली तर समाज व्यवस्थित राहतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने गाय वाटप करण्यात आले आहे. दूध विक्रीतून महिलांना हक्काचे पैसे मिळतील. यातून महिला अधिकाधिक स्वावलंबी होतील, असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

Pankaja Munde will be self-reliant through cow-slaughter | गायवाटपातून महिला स्वावलंबी होणार-पंकजा मुंडे

गायवाटपातून महिला स्वावलंबी होणार-पंकजा मुंडे

googlenewsNext
ठळक मुद्देपरळीत स्वयंसहायता समूहातील ८०० महिलांना गायींचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप

बीड : नीर (पाणी) आणि नारीचा सन्मान होणे गरजेचे आहे. नारी सुरक्षित राहिली तर समाज व्यवस्थित राहतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने गाय वाटप करण्यात आले आहे. दूध विक्रीतून महिलांना हक्काचे पैसे मिळतील. यातून महिला अधिकाधिक स्वावलंबी होतील, असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने परळी वैजनाथ येथे स्वयंसहायता समुहातील महिलांना गाय वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील महिलांना ८०० गायींचे वाटप करण्यात आले. तर कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात गायी वाटप करण्यात आल्या.
नटराज रंग मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले, जिल्हा परिषदेचेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष पालवे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. व्ही. सुरेवाड, रत्नमाला घुगे, उमा समशेट्टे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Pankaja Munde will be self-reliant through cow-slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.