पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह ५५ जणांवर गुन्हा, अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 02:45 AM2020-10-27T02:45:55+5:302020-10-27T07:27:24+5:30

Pankaja Munde News : जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. 

Pankaja Munde, Mahadev Jankar and 55 others were booked at Amalner police station | पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह ५५ जणांवर गुन्हा, अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह ५५ जणांवर गुन्हा, अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next

बीड :  जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मेळावा घेतल्याबद्दल माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह तीन आमदार, खासदार व इतर ५० अशा एकूण ५५ जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील  सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. 
हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री आ. महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर ‌व इतर ५० जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pankaja Munde, Mahadev Jankar and 55 others were booked at Amalner police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.