बीड मध्ये कडकडीत बंद पाळून सीएए, एनआरसीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:58 PM2020-01-24T23:58:33+5:302020-01-25T00:00:16+5:30

बीड : राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला बीड जिल्ह्यात ...

Opposed to CAA, NRC, following strict closure in Beed | बीड मध्ये कडकडीत बंद पाळून सीएए, एनआरसीला विरोध

बीड मध्ये कडकडीत बंद पाळून सीएए, एनआरसीला विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त : आठवडी बाजारही बंद; व्यावसायिकांचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा; सर्वत्र बंद शांततेत

बीड : राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रॅली काढून सरकारच्या धोरणाला विरोध करण्यात आला. शाळा-महाविद्यालये, व्यापारपेठ बंद होत्या. हा बंद शांततेत पार पडला. कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. यावेळी तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनास निवेदन देण्यात आले.
परळी शहर कडकडीत बंद
परळी : परळीत १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बंदला विविध ३६ संघटना व पक्षांनी पाठिंबा दिला. सकाळी १० वाजता रेल्वेस्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांना निवेदन दिले.
रॅलीमध्ये वंचित आघाडीचे गौतम साळवे, एन.के.सरवदे, मिलींद घाडगे, प्रसन्नजीत रोडे, संजय गवळी, अमोल बनसोडे, अनिल अवचार, शुभम इंगळे, भावेश कांबळे, राजेश सरवदे, धम्मा क्षीरसागर, बापू बनसोडे, सनी बनसोडे, प्रेम सरवदे, अमोल सावंत, बाळु किरवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या बंदच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. बंद शांततेत व सुरळीत पार पडला.
वडवणीत बंदला चांगला प्रतिसाद
वडवणी : शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून शहरात कार्यकर्ते एकत्र जमून व्यावसायिक प्रतिष्ठान बंद करण्याचे आवाहन करीत होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व बंद शांततेत पार पडला.
आष्टीत दुकाने बंद
आष्टी : शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यजात आले.
माजलगावमध्ये संविधान बचाव रॅली
माजलगाव : माजलगाव शहरात शुक्रवारी दुपारी संविधान बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीत भारिपचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष धम्मानंद साळवे यांच्यासह जमियत उलेमा हिंद, महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान व अन्य काही संघटना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील तरुण हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. काहींनी डोक्यावर मोठा पन्नास फूट तिरंगा कपडा घेतला होता. शिवाजी चौक मार्गे ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आली तेथे निवेदन दिल्यानंतर भाषणे झाली.
अंबाजोगाईत कडकडीत बंद
अंबाजोगाई : एनआरसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी राज्यव्यापी पुकारलेल्या बंदला अंबाजोगाई शहर व परिसरात प्रतिसाद मिळाला. यावेळी पक्षांचे कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत फिरत होते. अंबाजोगाईकरांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शहरातील मंडीबाजार, गुरुवारपेठ, प्रशांतनगर, आंबेडकर चौक, यशवंतराव चव्हाण चौक, भगवानबाबा चौक, मोंढा , सावरकर चौक या परिसरातील बाजारपेठ बंद राहिली. बंदच्या काळात कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Opposed to CAA, NRC, following strict closure in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.