Once upon a time, Parli testified for the development of the constituency - Dhananjay Munde | एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे
एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे

परळी : मी सर्व जातीधर्माच्या प्रश्नांसाठी लढलो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी भांडलो, समाजातील एकाही घटकासाठी मी काही केले नाही, असे झाले नाही. एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो, असे प्रतिपादन परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी केले.
विधानसभा निवडणूक प्रचाराची समारोप सभा शनिवारी परळीच्या मोंढा मैदानावर झाली. या सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होेते. प्रचाराच्या पहिल्या दिवसांपासून माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी लढतो आहे. विकासासाठी २५ वर्षे झटत आहे.एक वेळ मला संधी द्या, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून रॅलीचा प्रारंभ झाला.
माजी मंत्री पंडीतराव दौंड, जि.प.सदस्य संजय दौंड, वैजनाथ सोळंके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उघड्या जीपमध्ये त्यांच्यासमवेत होते.


Web Title: Once upon a time, Parli testified for the development of the constituency - Dhananjay Munde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.