मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:47 PM2019-08-08T23:47:29+5:302019-08-08T23:48:23+5:30

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे.

No one has the right to speak on 'Vaidyanath' while plundering farmers' lands! | मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही !

मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही !

Next
ठळक मुद्देसुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात : पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपास दिले प्रत्युत्तर

बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. त्यांचे आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहीत झाले आहे, असे सांगून मयत शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारांना वैद्यनाथ वर बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेसने काल परळी येथे जो मोर्चा काढला ते एक नाटक होते. हा मोर्चा मुळातच पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले आहे. धनंजय मुंडे यांनी मोर्चात पंकजा यांच्यावर केलेले आरोप हे केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून त्यांचा राजकीय द्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला असल्याचे आ. धस यांनी म्हटले आहे. पोषण आहारा संदर्भात पंकजा यांच्यावर त्यांनी केलेला आरोप तर हास्यास्पद आहे, एवढे मोठे संवेधानिक पद असताना कुठलाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे, सभागृहात ते पंकजा यांच्यावरील एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळेच आता निवडणुकीचे निमित्त साधून हा रडीचा डाव ते खेळत आहेत असे ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष रसातळाला चालल्याने ते व त्यांचे नेते बिथरले असून आरोप करण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा त्यांना चांगली अद्दल घडवणार आहे, असे ते म्हणाले.
तोडीपाणी करता, मग शेतकºयांचे पैसे का देत नाहीत ? : धस
जगमित्र कारखाना काढतो म्हणून धनंजय मुंडे यांनी अनेक शेतकºयांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले. याप्रकरणी शेतकºयांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे, असेही आ. धस म्हणाले.
तोडीपाणीचे राजकारण करता, मग त्या शेतकºयांचे पैसे का देत नाहीत? तुमचे शेतकºयांवर खरचं प्रेम असेल तर त्यांच्या लुबाडलेल्या जमिनीचा अगोदर हिशेब द्या मगच वैद्यनाथबद्दल बोला असे आ. धस म्हणाले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात पंकजा यांनी कारखाना अतिशय हिंमतीने चालवला आहे. आतापर्यंत ऊस उत्पादकांना ६५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
वैद्यनाथ कारखान्याच्या शेतकºयांची उर्वरित रक्कमही पंकजा मुंडे लवकरच देणार आहेत. त्यासाठी कर्ज मंजूर होणारं आणि पैसे मिळणार असं दिसलं की सर्व माहिती घेऊन धनंजय मुंडे यांनी मोर्चा त्यांनी काढला.
तथापि पंकजा यांनी कठीण परिस्थितीतून कारखान्याला बाहेर काढले. त्यामुळे शेतकºयांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सभासदांना त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन मदत केली आहे.
मात्र, धनंजय मुंडे केवळ सुडाचे राजकारण करून संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका आ. सुरेश धस यांनी केली आहे.

Web Title: No one has the right to speak on 'Vaidyanath' while plundering farmers' lands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.