आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:10 PM2020-02-14T19:10:57+5:302020-02-14T19:13:02+5:30

वड : रस्त्याच्या कडेला, बांधावर, डोंगरावर जिथे जागा मिळेल तिथे माझ्या सग्या- सोयऱ्यांची वस्ती आहे.

Never complain in life ... you want to keep growing, give shadow | आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची

आयुष्यात कधी तक्रार करायची नाही...आपण आपलं वाढत राहायचं, सावली द्यायची

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वडाच्या झाडाचे मनोगत

माझा जन्म नेमका कधी झाला माहीत नाही. साधारण १८२७ साल असावे. कोंब फुटले, पानं फुटली... पक्षी बसायला लागले. घरटी बनवून राहू लागली. त्यांचा किलबिलाट कोणत्याही संगीतापेक्षा मला अधिक आवडू लागला. सकाळी जायचे संध्याकाळी परतायचे. दिवसातल्या ताटातुटीनंतर भेटीची हुरहुर असायची. रस्त्याच्या कडेला, बांधावर, डोंगरावर जिथे जागा मिळेल तिथे माझ्या सग्या- सोयऱ्यांची वस्ती आहे. पुढे आमच्या (वडाच्या) ६०-७० जाती झाल्या. देता येईल तेवढं दिलं. सावली देताना लोक खूश असायचे. नंतर माणसं वाढली आणि रस्ते अपुरे पडू लागले. रस्त्यांना मोठे करण्यासाठी सर्वाधिक कत्तल माझी करण्यात आली. रुंदीकरणात आमचे लई नातेवाईक गेले. आयुष्यात कधी तक्रार करायची नाही, आपण आपलं वाढत राहायचं. पाणी देणारा असो वा तोडणारा सगळ्यांना सावली द्यायची. या गुणांमुळेच वृक्ष संमेलनात अध्यक्ष म्हणून मान मिळाला. आनंद झाला.  
- वड

(अध्यक्ष वडाच्या झाडाचे हे भाषण सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी वाचून दाखवले.) 
 

Web Title: Never complain in life ... you want to keep growing, give shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.