डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:59 PM2019-12-12T23:59:46+5:302019-12-13T00:00:50+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड व माजलगावला जाणाऱ्या दोन बस गाड्या डिझेल नसल्याने वडवणी व परळीहूनच परतल्या.

Lack of diesel, returning from bus half of Majalgaon, Nanded | डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत

डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्न घटले : परळीतही तिकीट काढण्याच्या मशीन पडल्या बंद

बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड व माजलगावला जाणाऱ्या दोन बस गाड्या डिझेल नसल्याने वडवणी व परळीहूनच परतल्या. तसेच परळी आगारातील तिकिट काढण्याच्या ६२ मशीन बंद पडल्याने बसेस उशिराने धावल्या. उत्पन्न घटू लागल्यानेच असे प्रकार होऊ लागल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.
बीड जिल्ह्यात आठ आगारातून ५०० पेक्षा जास्त बस गाड्या दररोज धावतात. बीड आगारात मंगळवारी नांदेड व माजलगावला जाणाºया बस गाड्यांमध्ये पुरेसे डिझेल नव्हते. त्यामुळे माजलगावची बस वडवणी व नांदेडची बस परळीहून परतली. उत्पन्नात घट झाल्याने आॅईल कंपनीला द्यायला पैसे नाहीत, म्हणून कंपनीने उशिरा टँकर पाठविल्याने डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. लांब पल्ल्याच्या तर परतल्याच परंतु ग्रामीण भागात जाणाºयाही बसेस नियोजित वेळेत धावल्या नाहीत. याला आगारातील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
तसेच परळी आगारातही तिकिट काढण्याच्या १२३ पैकी ६२ मशीन अचानक बंद पडल्या. त्यामुळे सर्व बसेस जागेवर थांबल्या होत्या. नियोजित वेळेपेक्षा उशिराने या सर्व बसेस धावल्या. उशिरा जरी बस धावल्या तरी आपण वेळ व उत्पन्न कव्हर करण्यात यशस्वी ठरलो, असे परळीचे आगार प्रमुख रणजीत राजपूत यांनी सांगितले.
प्रवाशांना त्रास; ‘रापम’बद्दल रोष
रापमच्या बसेस वेळेत धावल्या नाहीत. धावल्या त्या सुद्धा अर्ध्यातून परतल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
विभागीय नियंत्रक आणि वाहतूक अधिकारी अनभिज्ञ
याबाबत विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाट यांना विचारले असता, माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे म्हणाले, असा काहीही प्रकार नाही. विशेष म्हणजे बस फेºया रद्द बाबत बीड व परळी आगार प्रमुखांना सोशल मिडीयावरून वरिष्ठांना सर्व माहिती दिली होती. मात्र, वरिष्ठांनी ती माध्यमांपासून लपवून ठेवल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

Web Title: Lack of diesel, returning from bus half of Majalgaon, Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.